Shivsena माजी खासदार आनंदराव अडसूळ ED च्या रडारवर

दिव्येश सिंह

• 04:05 AM • 09 Sep 2021

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. ज्यात शिवसेनेच्याही काही नेत्यांचा समावेश आहे. प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी यांच्या उद्योगांशी संबंधित संस्थांवर ED ने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली. यानंतर माजी खासदार आनंदराव अडसूळही ED च्या रडावर आल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. City Cooperative Bank मध्ये पैशाच्या अफरातफरीवरुन ईडीकडे […]

Mumbaitak
follow google news

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. ज्यात शिवसेनेच्याही काही नेत्यांचा समावेश आहे. प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी यांच्या उद्योगांशी संबंधित संस्थांवर ED ने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली. यानंतर माजी खासदार आनंदराव अडसूळही ED च्या रडावर आल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे.

हे वाचलं का?

City Cooperative Bank मध्ये पैशाच्या अफरातफरीवरुन ईडीकडे तक्रार दाखल झाली आहे. गेल्या आठवड्यात ईडीने बँकेसह मुंबईतील सहा ठिकाणी छापेमारी केली होती. बँकेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या कर्जाच्या माध्यमातून पैशांची अपरातफर झाल्याची तक्रार अडसूळ यांनी मुंबई पोलिसांकडे दाखल केली होती. काही घटनांमध्ये कर्जाच्या विरुद्ध तारण ठेवण्यात आलेल्या गोष्टींचं मूल्य हे कमी असल्याचंही अडसूळ यांनी म्हटलं होतं. अडसूळ यांनी आपल्या तक्रारीत बँकेच्या कर्मचाऱ्यांसह ऑडीटर यांच्यावर ठपका ठेवला होता. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अडसूळ यांच्या या तक्रारीचा तपास केला होता.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अडसूळ यांनाही अशाच एका पद्धतीने कर्ज देण्यात आलेलं आहे. या संबंधीतच ईडीने छापेमारी केली होती. २०१९ साली आनंदराव अडसूळ यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी अडसूळ यांच्यावर मात केली होती. त्यामुळे या प्रकरणात ईडी अडसूळ यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

    follow whatsapp