शिवसेनेची मुलुखमैदान तोफ असा उल्लेख केले जाणारे फायरब्रांड नेते संजय राऊत यांना ईडीने रविवारी रात्री अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना विशेष न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. PMPLA न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. यानंतर चर्चा होते आहे ती राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची, त्यात केलेल्या संजय राऊत यांच्या उल्लेखाची.
ADVERTISEMENT
काय म्हटलं होतं राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्याबाबत?
राज ठाकरेंनी एप्रिल आणि मे महिन्यात सभांचा धडाका लावला होता. १२ एप्रिल २०२२ ला झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्याविषयी एक वक्तव्य केलं होतं. ” मी त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणाच्या वेळी बोललो होतो, शरद पवार खुश झाले की भीती वाटायला लागते. शरद पवार हल्ली संजय राऊत यांच्यावर खुश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही.”
१२ मार्च २०२२ ला काय म्हटलं होतं राज ठाकरेंनी संजय राऊत यांच्याबाबत?
१२ मार्चला राज ठाकरेंना संजय राऊत यांच्याविषयी प्रतिक्रिया विचारली होती, त्यावर राज ठाकरे म्हणाले होते की “संजय राऊत यांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे” असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.
या दोन वक्तव्यांची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. कारण ३१ जुलैला २०२२ रोजी ईडीने संजय राऊत यांच्या घरावर छापा मारला, तसंच पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नऊ तास चौकशी केली. संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेऊन पुन्हा चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक केली आहे. यानंतर आता राज ठाकरेंच्या या दोन वक्तव्यांची चर्चा चांगलीच रंगली आहे. राज ठाकरे यांनी वर्तवलेली दोन्ही भाकितं खरी ठरली आहेत काल ही चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांना पीएमएल न्यायालयाकडून जामीन मिळणार की, त्यांना ईडी कोठडीत जावं लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ईडीकडून संजय राऊत यांना ८ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली, पण पीएमएलए न्यायालयाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली.
पत्रा चाळ पुनर्विकासासाठी गुरूआशिष कन्स्ट्रक्शनसोबत करार केल्यानंतर जमीन घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असतानाच ईडीने उडी घेतली. या प्रकरणात ईडीकडून संजय राऊत यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता संजय राऊत यांची चौकशी ईडीकडून सुरू झाली होती.
संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीकडून आज दुपारी जेजे रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांना पीएमएलए न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. यावेळी ईडीने संजय राऊत यांची चौकशी करण्यासाठी ८ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली, मात्र कोर्टाने त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT