महाराष्ट्र बंदला विरोध म्हणजे शेतकरी चिरडण्याला पाठिंबा, भाजप आणि मनसेवर संजय राऊत यांचा निशाणा

मुंबई तक

• 02:21 PM • 11 Oct 2021

लखीमपूर खेरी या ठिकाणी शेतकऱ्यांना थारने चिरडण्यात आलं. निषेध करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे चिरडण्यात आलं आणि जे कृषी कायदे लागू करण्यात आले आहेत ते रद्द करण्यासाठी जे आंदोलन गेले दहा महिने सुरू आहेत त्यासंदर्भात आज महाराष्ट्र बंद करण्यात आला होता. हे आंदोलन केंद्रातील सरकार विरोधात होतं. हा बंद सपशेल अपयशी ठरला असं भाजपने म्हटलं […]

Mumbaitak
follow google news

लखीमपूर खेरी या ठिकाणी शेतकऱ्यांना थारने चिरडण्यात आलं. निषेध करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे चिरडण्यात आलं आणि जे कृषी कायदे लागू करण्यात आले आहेत ते रद्द करण्यासाठी जे आंदोलन गेले दहा महिने सुरू आहेत त्यासंदर्भात आज महाराष्ट्र बंद करण्यात आला होता. हे आंदोलन केंद्रातील सरकार विरोधात होतं. हा बंद सपशेल अपयशी ठरला असं भाजपने म्हटलं आहे. तर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी भाजपला उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

काही वेळापूर्वीच Tv9 मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी भाजप आणि मनसेवर टीका केली आहे. महाराष्ट्र बंदला विरोध दर्शवणं म्हणजे शेतकरी चिरडण्याला पाठिंबा देण्यासारखं आहे असं म्हणत संजय राऊत यांनी मनसे आणि भाजप या दोन्ही पक्षांवर टीका केली.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज बंद पाळण्यात आला. मात्र या बंदला भाजप तसेच मनसेने पाठिंबा दिला नाही. यावर बोलताना राऊत यांनी दोन्ही पक्षांवर घणाघाती टीका केली. ‘भाजप तसेच मनसे या बंदमध्ये सहभागी झालेले नाहीत. याचाच अर्थ त्यांनी शेतकऱ्यांना ज्या प्रकार चिरडून मारलं त्या घटनेला पाठिंबा दिला आहे’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज झालेल्या आंदोलनादरम्यान काही अप्रिय घटनाही घडला. काही ठिकाणी टायर जाळले गेले, मुंबईत बस फोडण्यात आल्या. रिक्षाचालकांना मारहाण झाली. याबाबत विरोधी पक्षांनी सरकारला लक्ष्य केलं. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आरोप नक्की करावेत. लोकशाही आहे, त्यामुळे आरोप करण्याचा अधिकार त्यांना नक्कीच आहे. पण अशा प्रकारची आंदोलनं झाली की ठिणग्या उडतातच. हरयाणा, दिल्ली या ठिकाणीही घटना घडल्या. देवेंद्र फडणवीस जे काही आरोप करत आहेत त्यामध्ये किती तथ्य आहे याबाबत कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे लोक बोलू शकतील. असं संजय राऊत म्हणाले.

लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ बंद पाळला जातोय. मात्र, महाराष्ट्रातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही भाजपने केला आहे. भाजपचे हे आरोपदेखील राऊत यांनी फेटाळून लावले. ‘महाराष्ट्रात निसर्गाचा तडाखा बसला आहे. ते सातत्याने होत आहे. मी सरकारतर्फे नाही. मी सरकारचा सदस्य नाही. पण माझ्या माहितीनुसार औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई हे त्या भागात शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत होते’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp