प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक
ADVERTISEMENT
थंडीच्या दिवसांमध्ये सध्या प्रत्येक जण व्यायाम करण्याकडे लक्ष देत असतो. मात्र त्याचा अतिरेक केल्यास जीवही जाऊ शकतो. नाशिकमध्ये अशीच एक घटना घडली आहे. नाशिकमध्ये प्राणायाम करताना असाच एका तीस वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला. श्वास घेताना तिला त्रास होऊ लागला आणि श्वास अडकल्याने ती जागीच कोसळली .नाशिकच्या मखमलाबाद परिसरात विद्या नगर मध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव सोनल आव्हाड असे आहे.
नागपूर : ८० वर्षीय वृद्धाचा अपघातात मृत्यू, पोलिसांनी ४ महिन्यांनी मयत वृद्धावरच दाखल केला गुन्हा
नेहमी हसतमुख असणाऱ्या सोनलला आज प्राणायाम करता करता आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले असता तिला मृत घोषित करण्यात आलं.
धक्कादायक! राजापूरमध्ये निलंबित एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, एसटी कर्मचारी आक्रमक
डॉक्टरांनी काय म्हटलं आहे?
आज जी घटना घडली त्यात सोनल यांना फुफ्फुसांशी निगडीत आजार होता हे आम्हाला शवविच्छेदनानंतर लक्षात आलं आहे. त्यानंतर आम्ही त्यासंदर्भातला रिपोर्टही दिला आहे. प्राणायम कुणी करावं? त्याचे परिणाम, दुष्परिणाम होतात का? ते पण लक्षात घेतलं पाहिजे. सृदृढ व्यक्तीने प्राणायम केल्यास आणि त्यासाठी त्याला व्यवस्थित मार्गदर्शन मिळत असल्यास काही अडचणी येत नाहीत. सहवेदना, सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींनी प्राणायम करायचं असेल तर त्याचं शास्त्र समजून घेतलं पाहिजे. शास्त्रोक्त पद्धतीने आणि मार्गदर्शनाखाली प्राणायम केलं पाहिजे. प्राणायम केल्याने जीव जातो असं नाही मात्र सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत अशी घटना घडू शकते. मार्गदर्शन घेणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतरच प्राणायम केलं जावं असंही जिल्हा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी म्हटलं आहे.
सोनल यांचा मृत्यू निमोनिया आणि फुफुसाच्या आजाराने झाल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे. फुफ्फुसाचा आजार असलेल्या किंवा चुकीच्या पद्धतीने प्राणायाम केल्यास असा मृत्यू ओढावू शकतो असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे. सोनाली यांच्या मृत्यूमुळे आव्हाड कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
ADVERTISEMENT