मी उजवीकडे जाऊ की डावीकडे?, पंकजा मुंडेंचा प्रश्न, कार्यकर्ते म्हणाले…

मुंबई तक

• 02:37 PM • 13 Aug 2022

रोहिदास हातागळे, बीड, प्रतिनिधी बीड: आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी परळी शहरात भव्य रॅली काढण्यात आली आणि या रॅलीस संबोधन करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की भारताला स्वातंत्र्य मिळून 15 ऑगस्ट ला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. ही आझादी आपल्याला अशीच मिळाली नाही तर त्यासाठी […]

Mumbaitak
follow google news

रोहिदास हातागळे, बीड, प्रतिनिधी

हे वाचलं का?

बीड: आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी परळी शहरात भव्य रॅली काढण्यात आली आणि या रॅलीस संबोधन करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की भारताला स्वातंत्र्य मिळून 15 ऑगस्ट ला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. ही आझादी आपल्याला अशीच मिळाली नाही तर त्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. अनेकांचा त्याग आणि संघर्ष यामुळेच आपल्याला हे स्वतंत्र मिळाले आहे.

मी डावीकडे गेले तर चालेल का? -पंकजा मुंडे

मी उजवीकडे गेले तर जमेल की मी डावीकडे गेल्यास जमेल असा सवालही पंकजा मुंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केला त्यावेळी जमलेल्या नागरिकांनी पंकजा मुंडे यांना कुठेही न जाण्यास नकार दिला तर आम्ही आपल्या सोबत आहोत ताई असे म्हणत पंकजा मुंडे यांना धीर दिला. मात्र नेमके पंकजा मुंडे यांनी उजव्या आणि डाव्या बाजूस गेले तर चालेल का असा सवाल का उपस्थित केला यावर मात्र चर्चेला उधाण आले आहे.

आपल्याला भले ही काही नाही मिळाले पण…-पंकजा मुंडे

माझ्या कार्यकर्त्यांमध्ये खूप नाराजी होती. मी त्यांना म्हणाले की तुम्ही नाराज होऊ नका कारण आपल्याला भले ही काही नाही मिळाले पण गोपीनाथ मुंडे यांची शिकवण आहे की, मी झुकनार नाही, मी मातनार नाही, घेतला वसा टाकणार नाही म्हणून मला 90 हजार लोकांनी मतदान केले आहे त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

सध्या सत्ता आपली आहे, बघू आपल्याला काही मिळतंय का?- पंकजा मुंडे

पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या ”सध्या सत्ता आपली आली आहे. बघू आपल्याला काही मिळतंय का? नाही जर मिळाले तर परत आपला विकास पूर्ण करणार असल्याचे ही त्या म्हणाल्या. काही दिवसानंतर मी प्रत्येक प्रभागात जाऊन पाहणी करणार आणि जो चांगले काम करतोय त्यास मी आगामी नगर परिषद निवडणुक लढवण्यासाठी तिकीट देणार. भलेही तो पैशाने फाटका जरी असेल तरी चालेल.”

”तुम्ही मला जेव्हा ही भेटाल तेव्हा मला असाच विश्वासाचा धागा बांधा”

महिलांवर अत्याचार हे सतत सुरू आहेत. महाराष्ट्रतील महिलांचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य राहणार आहे. आज मला रॅलीमध्ये राख्या बांधल्या, मला प्रश्न पडला की मी काही पुरुष नाही मात्र विश्वासाने मला हा धागा बांधला गेला आहे. मी सर्वांना विनंती करेल की तुम्ही मला जेव्हा ही भेटाल तेव्हा मला असाच विश्वासाचा धागा बांधा आपले असेच ऋणानुबंध अधिक मजबूत होतील असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

धनंजय मुंडेंविषयी काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

सध्या फोटोचे राजकारण सुरू झाले आहे. गोगल गाईमुळे शेतीचे खूप नुकसान झाले आहे. महिलांवर अत्याचार झाले आहेत आणि अश्या ठिकाणी फक्त जाऊन फोटो काढून दाखवण्यापूरते सध्या काम सुरू आहे. त्यांचे आर्थिक समाधान करणे गरजेचे असतांना फक्त तुम्ही फोटो काढून असे सोशियल मीडियावर टाकत आहात हे चुकीचे आहे असे फार काळ चालणार नाही असे म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवरती नाव न घेता टीका केली आहे.

    follow whatsapp