श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आफताब पूनावालाच्या विरोधात सबळ पुरावे शोधण्यासाठी दिल्ली पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत. आज पोलिसांच्या हाती महत्त्वाचा धागा लागला आहे. यामुळे ही केस सोडवण्यात पोलिसांना मदत मिळू शकणार आहे. दिल्ली पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे. या फुटेजमध्ये आफताब एक बॅग घेऊन येताना दिसतो आहे. दिल्ली पोलिसांसोबत आज गुरुग्राम पोलीसही आले होते. पोलिसांना आफताबच्या फ्लॅटवर कपडे सापडले आहे, त्यात श्रद्धाच्या कपड्यांचाही समावेश आहे.
ADVERTISEMENT
दिल्ली पोलिसांना CCTV फुटेज मिळालं
दिल्ली पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. पोलिसांना आफताबचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे. हे सीसीटीव्ही फुटेज १८ ऑक्टोबरचं आहे. पोलिसांना या फुटेजमध्ये आफताबच्या हातात एक बॅग दिसते आहे. पोलिसांना हा संशय आहे की आफताब १८ ऑक्टोबरला श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी गेला असावा.
श्रद्धाच्या मित्रांची पोलिसांकडून चौकशी
आज दिल्ली पोलिसांनी श्रद्धा वालकरच्या मित्रांची चौकशी केली आहे. पोलिसांनी आधी राहुल आणि त्यानंतर गॉडविन या दोघांची चौकशी केली आहे. या चौकशीतून काही माहिती मिळणार का? त्याचा सबळ पुरावा म्हणून उपयोग होणार का? हे पोलीस तपासत आहेत.
दिल्ली पोलिसांची एक टीम हिमाचलला
दिल्ली पोलिसांची एक टीम हिमाचल प्रदेशात गेली आहे. हिमाचल प्रदेशातल्या पार्वती घाटी या ठिकाणी असलेल्या तोष गावात ही टीम गेली आहे. इथे पोलीस स्थानिकांची चौकशी करणार आहेत. पोलिसांना तीन गोष्टी प्रामुख्याने हव्या आहेत. त्यात मोबाइल, श्रद्धाचे कपडे, तसंच श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ज्या हत्याराने करण्यात आले ते हत्यार पोलीस शोधत आहेत.
पोलिसांनी आफताब आणि श्रद्धाचे कपडे घेतले ताब्यात
दिल्ली पोलिसांनी आफताबच्या घरात असलेले कपडे जप्त केले आहेत. यामध्ये बहुतांश कपडे हे आफताबचे आहेत. याशिवाय पोलिसांना श्रद्धाचे कपडेही मिळाले आहेत. या दोघांचे कपडे पोलिसांनी फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवले आहेत. पोलिसांना अद्याप ते कपडे सापडलेले नाहीत जे आफताब आणि श्रद्धाने श्रद्धाची हत्या झाली त्यादिवशी घातले होते. मात्र पोलिसांना हे वाटतं आहे की आज जे कपडे मिळाले आहेत त्यातून महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात.
दिल्ली पोलिसांना आत्तापर्यंत काय मिळालं काय नाही मिळालं?
दिल्ली पोलिसांना श्रद्धाच्या शरीरातली १३ हाडं मिळालीआहे. पोलिसांना अद्याप श्रद्धाचं शीर सापडलेलं नाही. तसंच तिचा मोबाइलही मिळालेला नाही. ज्या धारदार शस्त्राने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले ते हत्यारही पोलिसांना मिळालेलं नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की ज्या दुकानातून कथित रूपाने सुरा घेतला होता तो दुकानदारही अद्याप काही नीट माहिती देऊ शकलेला नाही. ज्या दुकानातून आफताबने फ्रिज घेतला होता त्या दुकान मालकाला पेमेंटबाबत लक्षात नाही.
पोलिसांना आफताबचा फोन जप्त केला आहे. पोलिसांनी Bumble अॅपची चौकशीही करू शकतात. आफताब आणि श्रद्धा याच अॅपवर भेटले होते. आफताबचं प्रोफाईलही पोलीस तपासत आहेत. तसंच पोलीस हे तपासत आहेत की आफताब कोणत्या मुलींच्या संपर्कात होता?
ADVERTISEMENT