मुंबई: अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्यातील लव्ह-हेट रिलेशनशीप काही लपून राहिलेली नाही. बिग बॉस 13 च्या घरात दोघांमध्ये झालेले वाद हे सर्वाधिक चर्चेत होते. रश्मीने सिद्धार्थवर चहा फेकणे, सिद्धार्थने रश्मीला तू ‘तशी मुलगी’ आहे म्हणणे, या सगळ्या गोष्टी बिग बॉसमध्ये पाहायला मिळाल्या होत्या.
ADVERTISEMENT
बिग बॉसच्या 13 च्या सीझनमध्ये जे घडलं त्यापैकी बऱ्याच गोष्टी या दोघांमुळेच घडत असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी दोघंही एकमेकांचे कट्टर वैरी झाले होते. त्यातूनच त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. असं असताना सिद्धार्थ शुक्लाचं अचानक निधन होणं ही गोष्ट रश्मी देसाईला खूपच दु:ख देणारी ठरली आहे.
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं गुरुवारी वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाले. सिद्धार्थचा मृत्यूने अवघ्या सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीनंतर रश्मीने सोशल मीडियावर एक ‘हार्ट ब्रेक’ इमोजी शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या होता. दरम्यान, सिद्धार्थच्या निधनाचं वृत्त समजताच ती तिच्या आईसोबत सिद्धार्थच्या घरीही गेली होती.
रश्मीने एक भावनिक पोस्टही केली शेअर
सिद्धार्थच्या निधनाचं वृत्त समजताच रश्मी देसाई फारच हळवी झाल्याचं पाहायला मिळतं आहे. सिद्धार्थ शुक्लासोबत घालवलेल्या काही खास आठवणी आणि फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रश्मी आणि सिद्धार्थाचं नेमकं नातं कसं होतं हे देखील पाहायला मिळतंय.
दरम्यान, हा फोटो शेअर करताना रश्मीने असं म्हटलं आहे की, ‘कधी-कधी आयुष्य गुंतागुंतीचे बनते. पण आज हा एक रिमांडर आहे की आपल्यापेक्षाही काही तरी मोठं आहे. शब्दांना आता अर्थ नाही.’ असं लिहून रश्मीने हार्ट ब्रेकचं इमोजी देखील टाकलं आहे.
रश्मी देसाई आणि सिद्धार्थ ने ‘दिल से दिल तक’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यावेळी त्यांच्यात अफेअर असल्याचा अनेक बातम्या आल्या होत्या. त्यामुळे ही जोडी खूपच चर्चेत होती. मात्र, नंतर असं समोर आलं की, या दोघांमध्ये सातत्याने भांडणं होतं. आहे. ज्यामुळे ते हळूहळू एकमेकांपासून दूर झाले. दरम्यान, असं असलं तरीही कधीही दोघांनी आपल्या नात्याविषयी कुठेच खुलेपणाने चर्चा केली नव्हती.
सिद्धार्थने मॉडेलिंगपासून केलेली करिअरची सुरुवात
12 डिसेंबर 1980 रोजी मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थ शुक्लाने एक मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. 2004 मध्ये त्याने छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 2008 मध्ये, तो ‘बाबुल का आंगन छोटे ना’ नावाच्या टीव्ही मालिकेत सर्व प्रथम छोट्या पडद्यावर झळकला होता. पण अभिनेता म्हणून त्याला खरी ओळख ही ‘बालिका वधू’ या मालिकेतूनच मिळाली. ज्यामुळे तो घरोघरी पोहचला.
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये यश मिळाल्यानंतर सिद्धार्थ शुक्ला देखील बॉलिवूडकडे वळला. तो 2014 मध्ये हंपटी शर्मा की दुल्हनिया चित्रपटात दिसला होता. तर याच वर्षी (2021) त्याची ‘ब्रोकन बट ब्युटिफुल’ नावाची वेब सीरीज देखील आली होती.
ADVERTISEMENT