मुंबई: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूबाबत आता सगळ्यात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आता समोर आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अद्याप डॉक्टरांनी कोणतंही मत नोंदवलेलं नाही.
ADVERTISEMENT
महत्त्वाची बाब म्हणजे सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचे सर्व अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे शवविच्छेदनाचा अद्याप कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेल नाही. मात्र, यावेळी एक गोष्ट अधोरेखित करण्यात आली आहे. ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, सिद्धार्थ शुक्लाच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा नव्हत्या किंवा अंतर्गत जखमा देखील आढळून आलेल्या नाहीत.
सिद्धार्थ शुक्ला याचं काल (2 सप्टेंबर) रोजी निधन झालं होतं. त्यानंतर त्याच्यावर कूपर रुग्णालयात पोस्टमार्टम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्याचा प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये डॉक्टरांनी आपलं काहीही मत व्यक्त केलेलं नाही. हिस्टोपॅथोलॉजी स्टडी आणि केमिकल अॅनालिसेसद्वारे त्याचा मृत्यूचं नेमकं काय कारण होतं हे तपासलं जाणार आहे. सिद्धार्थचं व्हिसरा देखील सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. ते देखील तपासले जाणार आहे.
सिद्धार्थ शुक्लाच्या प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्टमधील नेमकी माहिती काय?
-
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी कोणतेही मत दिलेले नाही.
-
सर्व अहवाल प्रलंबित आहेत आणि सध्या तरी डॉक्टरांनी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही.
-
सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमॉर्टमबाबत डॉक्टरांनी कोणतेही मत दिलेले नाही.
-
सिद्धार्थचे व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
-
हिस्टोपॅथोलॉजी स्टडी आणि केमिकल अॅनालिसेसद्वारा (Chemical Analysis) त्याचा मृत्यूचं नेमकं काय कारण होतं हे तपासलं जाईल.
-
पोस्टमॉर्टम अहवालात सिद्धार्थच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा नव्हत्या किंवा अंतर्गत जखमा आढळून आलेल्या नसल्याचं नमूद केलं आहे.
दरम्यान, सिद्धार्थचा थेट मृतदेहच रुग्णालयात आल्याने त्याची पुन्हा-पुन्हा तपासणी केली जात आहे. संशयाला कुठेही जागा राहू नये यासाठी मुंबई पोलीस प्रयत्नशील आहेत. कारण सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एकूणच संपूर्ण प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. एवढंच नव्हे तर याप्रकरणी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप देखील करण्यात आले होते. असं असल्याने याप्रकरणी सुरुवातीपासूनच मुंबई पोलिसांनी सावध पवित्रा घेतलेला आहे.
Sidharth Shukla: सिद्धार्थवर आज अंत्यसंस्कार, पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचं कारण येणार समोर
सिद्धार्थ शुक्ला याचं पोस्टमार्टम करण्याचा जेव्हा निर्णय घेण्यात आला तेव्हा त्यावेळेस डॉक्टरांच्या एका टीमसह पोलिसांची एक टीम देखील पोस्टमार्टम वॉर्डमध्ये उपस्थित होती. तसंच या वॉर्डच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही देखील लावण्यात आले. ज्यामुळे पोस्टमार्टमबाबत पारदर्शकता राहील.
ADVERTISEMENT