Sidhu Moose Wala Death: सिद्धू मूसेवालाची दिवसाढवळ्या अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावर ३० गोळ्या झाडण्यात आल्या. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. मात्र आता या प्रकरणी नवा खुलासा झाला आहे. सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा कट दिल्लीच्या तिहार जेलमध्ये रचला गेला असं आता समोर येतं आहे. लॉरेन्स बिश्नोईने व्हर्चुअल फोननंबर्सवरून विदेशात असलेल्या गोल्डी बरारसोबत अनेकदा या हत्येबाबत बोलणं केलं होतं.
ADVERTISEMENT
तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची चौकशी आता पोलीस करणार आहेत. पंजाब पोलीस त्याला रिमांडवरही घेऊ शकतात. लॉरेन्स बिश्नोई तिहारच्या क्रमांक ८ च्या बराकीत अत्यंत कठोर सुरक्षेत बंद आहे. तो जेलमधूनच त्याची गँग ऑपरेट करतो असंही समोर आलं आहे.
लॉरेन्स बिश्नोईच्या खास हस्तकांची संख्या ७०० च्याही पुढे आहे. यामध्ये प्रोफेशनल शूटर्सही आहेत. बिश्नोई दारू माफियांकडून खंडणी गोळा करतो. लॉरेन्सची गँग पंजाब, हरयाणा, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश या राज्यांसहीत बाहेरच्या देशांमध्येही पसरली आहे. लॉरेन्सच्या पार्टनर कुख्यात गँगस्टर संदीप उर्फ काला जठेडी आहे. एकेकाळी त्याच्यावर पाच लाखाचं बक्षीस लावण्यात आलं होतं. दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने त्याला अटक केली होती.
सिद्धू मूसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी हा दावा केला आहे की त्यांच्या मुलाला म्हणजेच सिद्धूला लॉरेन्स गँगकडून धमक्या मिळत होत्या. तसंच त्याच्याकडून खंडणीही मागण्यात येत होती. मूसेवालाला अनेकदा खंडणीसाठीही फोन यायचे. धमक्या दिल्या जात होत्या असं त्याच्या वडिलांनी म्हटलं आहे. सिद्धूचे वडील बलकौर यांनी म्हटलं आहे की सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांमुळे सिद्धूने बुलेटप्रुफ फॉर्च्युनर कारही विकत घेतली होती. रविवारी सिद्धू त्याच्या मित्रांसह थार कारमधून निघाला होता. बुलेटप्रुफ कार आणि दोन गनमॅन त्याने घरी ठेवले होते.
सिद्धू मुसेवालाची हत्या का झाली?
सिद्धू मुसेवालाची २९ मे रोजी मानसा जिल्ह्यातील त्याच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पंजाबचे पोलीस महासंचालक व्ही.के. भावरा यांनी सांगितलं की, ‘सिद्धू मुसेवाला जेव्हा त्याच्या घरातून निघाला, तेव्हा रस्त्यात दोन गाड्या मागून व दोन गाड्या समोरून आल्या आणि त्यांनी गोळीबार केला.’
‘सिद्धू मुसेवालाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. सिद्धू मुसेवाला याची जुन्या वादातून हत्या करण्यात आली, असंच सध्या दिसतंय. लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य लक्कीने याने घेतली आहे. तो सध्या कॅनडामध्ये आहे,’ असं ते भावरा यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT