Sidhu Moose Wala च्या हत्येचे धागेदोरे पुण्यापर्यंत; लॉरेन्स बिश्नोई गँगची ‘ती’ खेळी फसली

मुंबई तक

06 Jun 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:05 AM)

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. सिद्ध मुसेवालाच्या हत्येसाठी ८ शार्प शूटर्स बोलावण्यात आले होते. यात दोन शार्प शूटर्स हे पुण्यातील असल्याचं समोर आलंय. पुणे ग्रामीण पोलिसांनी तशी माहिती पंजाब पोलिसांना दिलीये. पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला याच्या हत्येमागे असलेल्या संशयित ८ शूटर्सची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. या […]

Mumbaitak
follow google news

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. सिद्ध मुसेवालाच्या हत्येसाठी ८ शार्प शूटर्स बोलावण्यात आले होते. यात दोन शार्प शूटर्स हे पुण्यातील असल्याचं समोर आलंय. पुणे ग्रामीण पोलिसांनी तशी माहिती पंजाब पोलिसांना दिलीये.

हे वाचलं का?

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला याच्या हत्येमागे असलेल्या संशयित ८ शूटर्सची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात मनप्रीत सिंग मन्नू याला अटक करण्यात आलेली असून, ३ शूटर्स पंजाबमधीलच आहेत. २ महाराष्ट्र, २ हरयाणा आणि एक शूटर राजस्थानातील असल्याचं तपासातून समोर आलं आहे.

मारेकऱ्यांनी सिद्धू मुसेवालाची अक्षरशः केली चाळण, शरीरातून मिळाल्या तब्बल दोन डझन गोळ्या

सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणातील शूटर्सचा आता पोलिसांकडून शोध घेतला जात असून, पुणे ग्रामीण पोलिसही सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव यांचा शोध घेत आहेत. महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, हरयाणा आणि राजस्थानात पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

सीसीटीव्ही फूटेज ठरलं महत्त्वाचं

सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणातील आरोपींना पुणे पोलिसांनी सीसीटिव्ही पाहून ओळखले. पुणे पोलिसांनी सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव अशी दोघांची नावं असून, दोघेही लॉरेन्स बिश्नोई टोळीतील आहेत. संतोष जाधव ६ महिन्यांपासून फरार आहे. संतोष जाधववर मकोका कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. संतोष मंचरचा असून, ओंकार बाणखेलेच्या खूनानंतर तो फरार झाला होता.

Sidhu Moose Wala Death: दिल्लीच्या तिहार तुरुंगातच रचण्यात आला सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधव याचं वय २२ वर्ष असून, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्याचे वडील मंचरमध्ये एका हॉटेलमध्ये काम करतात, तर संतोष जाधव याला नशेचं व्यसन आहे. सध्या पोलीस या दोघांचाही शोध घेत आहेत.

पंजाबातील मनप्रीत सिंग मन्नू याला पोलिसांनी उत्तराखंडमधून अटक केली. त्याच्यावर सामान आणि शूटर्संना गाडी दिल्याचा आरोप आहे. त्याची चौकशी करण्यात आल्यानंतर आता ७ जणांचा शोध घेतला जात आहे.

सिद्धू मुसेवालाच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँग,
का करण्यात आली हत्या?

ते सात जण कोण आहेत?

जगरुप सिंग रुपा (तरणतारण, पंजाब)

हरकमल ऊर्फ रानू (भटिंडा, पंजाब)

प्रियव्रत ऊर्फ फौजी (सोनीपत, हरयाणा)

मनजीत ऊर्फ भोलू (सोनिपत, हरयाणा)

सौरव ऊर्फ महाकाळ (पुणे, महाराष्ट्र)

संतोष जाधव (पुणे, महाराष्ट्र)

सुभाष बनौदा (सिकर, राजस्थान)

या सर्व शूटर्सचं कनेक्शन लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. कॅनडात असलेल्या गोल्डी बरारच्या सांगण्यावरून त्यांनी सिद्धू मुसेवालाची हत्या केली.

पोलीस आणि तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याचा होता प्लान

सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी वेगवेगळ्या राज्यातील शूटर्सची निवड करण्यात आली होती. हे मुद्दामहून करण्यात आलं होतं. पोलीस आणि तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी लॉरेन्स गँगची ही खेळी होती. पोलिसांचा तपास भलत्याच दिशेने जावा आणि शूटर्संना अटक होऊ नये, असा यामागे प्लान होता, असं पंजाब आणि दिल्ली पोलिसांना तपासात आढळून आलं.

    follow whatsapp