कोल्हापूरचा एतिहासिक जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी गेले 18 दिवस साखळी उपोषण करण्यात येत आहे. आज आंदोलनाच्या 19 व्या दिवशी जयप्रभा बचावचे लक्षवेधी फेस मास्क घालून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सभासदांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून मूक पदयात्रा काढली. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास खरी कॉर्नर येथून या पदयात्रेला सुरुवात झाली.
ADVERTISEMENT
लक्षवेधी असणाऱ्या पदयात्रेमध्ये सर्वांनी आपल्या चेहऱ्यावर फेस मास्क घातले होते. या फेस मास्कवर जयप्रभा बचाव असं लिहिलं होतं तसेच डोळ्यातून अश्रूचे थेंब पडतानाही दाखवले गेलेत. पदयात्रेतील प्रत्येकाच्या हातात जयप्रभा स्टुडिओ चे महत्व पटवून देणारे फलकही देण्यात आले आले होते. भविष्यात जयप्रभा स्टुडिओ वाचण्यासाठी विकत घेणाऱ्यांच्या घरावर देखील मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
लता मंगेशकर यांच्या मालकीचा जयप्रभा स्टुडिओ दोन वर्षांपूर्वीच एका शिवसेनेच्या नेत्याच्या मुलाने खरेदी केल्याची धक्कादायक माहिती आता कोल्हापूरकरांना काही दिवसांपूर्वी समजली आहे. ज्यामुळे कोल्हापुरात याबाबत प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कोल्हापूरच्या मंगळवार पेठ इथं जयप्रभा स्टुडिओ अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. भालजी पेंढारकर यांनी लता मंगेशकर यांना 1959 साली जयप्रभा स्टुडिओची तेरा एकर जागा साठ हजार रुपयाला विकली होती. अनेक नाट्य, चित्रपटाचं शूटिंग या ठिकाणी झालं आहे. भालजी पेंढारकर 1959 साली आर्थिक अडचणीत आल्यानंतर त्यांनी हा स्टुडिओ लता मंगेशकर यांना विकला. त्यानंतर लता मंगेशकर यांनी 2008 साली विवेक जैस्वाल यांना स्टुडिओचा काही भाग विक्री करून रहिवासी संकुलासाठी खरेदीचा व्यवहार झाला.
त्यावेळी कोल्हापुरातील कलाकारांनी रस्त्यावर उतरून लता मंगेशकर यांच्या जयप्रभा स्टुडिओतील रिकाम्या जागेची विक्री करत असल्याच्या निषेधार्थ अनेक वेळा आंदोलन केलं होतं. मात्र तेरा एकरपैकी दहा एकर जागा लता मंगेशकर यांनी 2008 साली विवेक ओसवाल यांना विकत दिली. तर उर्वरित स्टुडिओ साधारण तीन एकर ही जागा जनआंदोलनामुळे नंतर मंगेशकर कुटुंबीयांनी कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओमध्ये अस्तित्व कायम राहील असा शब्द दिला होता.
लता मंगेशकर यांचं आठ दिवसांपूर्वीच निधन झालं त्यानंतर त्यांचं स्मारक बनावं यासाठी हालचाली सुरू झाल्या. पण कोल्हापुरातील जागृत नागरिकांना हा स्टुडिओ दोन वर्षांपूर्वी मंगेशकर कुटुंबीयांनी 6 कोटी 50 लाखाचा व्यवहार करून विकला असल्याचं समोर आलं असून त्यासाठी शिवसेना माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची दोन मुले पुष्कराज राजेश क्षीरसागर, ऋतुराज राजेश क्षीरसागर, यांच्यासह सात भागीदारांसह याचा व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले.
ADVERTISEMENT