सोलापूर शहरातील काँग्रेस नेते करण म्हेत्रे यांचा शनिवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रविवारी सकाळी करण म्हेत्रे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्ययात्रेत म्हेत्रे यांच्या समर्थकांनी चांगलीच गर्दी केली होती. ज्यात कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचा फज्जा उडालेला पहायला मिळाला.
ADVERTISEMENT
शनिवारी दुपारी म्हेत्रे यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे. मौलाली चौक ते सिद्धार्थ चौक परिसरातून म्हेत्रे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. सोलापूर शहरातील मोची समाजाचे म्हेत्रे नेते होते. त्यांना मानणारा मोठा जनसमुदाय शहरात आहे. परंतू आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली देत असताना पाठीराख्यांना आपल्याकडून कोरोनाविषयक नियमांचा भंग होतोय याचं भानही नव्हतं.
रविवारी सकाळी १० वाजता म्हेत्रे यांच्या घरातून या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. सरस्वती चौकातून निघालेल्या या अंत्ययात्रेत नंतर म्हेत्रे यांच्या समर्थकांची गर्दी करुन सर्व नियम पायदळी तुडवले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचे म्हेत्रे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे.
विरार : हळदीच्या कार्यक्रमात फ्री-स्टाईल हाणामारी, मद्यधुंद अवस्थेत ३-४ गट आपापसात भिडले
ADVERTISEMENT