Solapur: हनिट्रॅपमधील भाजप नेत्याचा बेडरुममधील व्हिडिओ व्हायरल!

मुंबई तक

• 12:03 PM • 12 Jul 2022

विजयकुमार बाबर सोलापूर – भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्याचा बेडरूममधील व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.संबंधित नेत्याने आपली फसवणूक केल्याचे या व्हिडिओत ती महिला सांगत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे याच नेत्याने सात जुलै रोजी संबंधित महिलेच्या विरोधात मुंबईतील ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. आता त्या नेत्याचा थेट बेडरूममधील […]

Mumbaitak
follow google news

विजयकुमार बाबर

हे वाचलं का?

सोलापूर – भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्याचा बेडरूममधील व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.संबंधित नेत्याने आपली फसवणूक केल्याचे या व्हिडिओत ती महिला सांगत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे याच नेत्याने सात जुलै रोजी संबंधित महिलेच्या विरोधात मुंबईतील ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. आता त्या नेत्याचा थेट बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल झाल्याने पक्ष कोणती भूमिका घेतो, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित नेता हा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो सध्या जिल्ह्यात महत्त्वाच्या पदावर आहे. त्यामुळे या व्हायरल व्हिडिओमुळे सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामध्ये ती महिला संबंधित नेत्याचे नाव घेऊन त्यांनी मला फसवले आहे,असे सांगत असल्याचे त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित नेत्याने त्या महिलेवर हनिट्रॅपच्या आरोप करत ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांची सोलापूर जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

सोलापूर जिल्ह्यात हा नेता महत्त्वाच्या पदावर काम करतो. त्या नेत्याने पोलिस ठाण्यात तक्रार देऊन संबंधित महिलेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले हेाते, त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामुळे तो नेमका कोणी केला, अशीही चर्चा सुरू झाली आहे. त्या नेत्याचा थेट बेडरुममधील व्हिडिओ व्हायरल झाल्याने भारतीय जनता पक्ष कोणती भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. एरव्ही आपण इतर पक्षांपेक्षा वेगळे आहोत,असा दाखवणारा भाजप या प्रकरणात संबंधित नेत्यावर कारवाई करणार का,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत एका महिला मुंबईत घर आणि दोन कोटी रुपयांची मागणी करत असल्याचे म्हटले होते. पैसे दिले नाही तर राजकीय आणि सामाजिक स्तरावर बदनामी करण्याची धमकीही दिली होती. त्या तक्रारीनुसार महिलेच्या विरोधात मुंबईतील ओशिवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

    follow whatsapp