गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांत अमली पदार्थाच्या तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी NCB च्या मुंबईतील पथकाने नांदेड येथे कारवाई करत आंध्र प्रदेशातून येणारा अमली पदार्थांचा ट्रक पकडला होता. ज्यानंतर मुंबई पोलिसांनी कोल्हापुरात एका अमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर छापेमारी केली होती. यानंतर सोलापूर पोलिसांनीही अशीच एक धडाकेबाज कारवाई केली आहे.
ADVERTISEMENT
सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी एका संशयिताला नाईट पेट्रोलिंग दरम्यान गांजाची वाहतूक करताना पाठलाग करुन पकडलं आहे. एका संशयित इनोव्हा गाडीचा पाठलाग करत पोलिसांनी त्यातून ६२३ किलो गांजा जप्त केला आहे. ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत १ कोटी २४ लाखांच्या घरात असल्याचं बोललं जातंय.
लाट आली म्हणून गाडी वळवली अन्…; एक ठार, अक्सा बीचवर अंगावर शहारे आणणारी घटना
या कारवाईदरम्यान तीन पैकी दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उर्वरित फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती सोलापूरच्या पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली आहे.
गाडी घेण्यासाठी आईने पैसे न दिल्याचा राग, मोठ्या भावाने दिव्यांग भावाची गळा दाबून केली हत्या
ADVERTISEMENT