Solapur : लग्नाळूंच्या भावनांशी खेळ; शेकडो तरुणांची फसवणूक; रॅकेट उद्धवस्त

मुंबई तक

29 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:33 AM)

सोलापूर : काही दिवसांपूर्वी लग्न जमत नसल्यानं बाशिंग बांधून तरुणांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला होता. त्यानंतर आता लग्न जमत नसलेल्या शेकडो तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार सोलापूर (Solapur) आणि शेजारील उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात समोर आला आहे. लग्नाळू युवकांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन फी घेऊन फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. (Solapur police busted […]

Mumbaitak
follow google news

सोलापूर : काही दिवसांपूर्वी लग्न जमत नसल्यानं बाशिंग बांधून तरुणांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला होता. त्यानंतर आता लग्न जमत नसलेल्या शेकडो तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार सोलापूर (Solapur) आणि शेजारील उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात समोर आला आहे. लग्नाळू युवकांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन फी घेऊन फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. (Solapur police busted the racket of cheating youths by luring them into marriage)

हे वाचलं का?

बार्शी तालुक्यातील बायपास रोडवर कथित महिला वधू-वर सुचक मंडळाने मंगल कार्यालयात सुशिक्षित मराठा महिला वधू-वर पालक परिचय मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला उस्मानाबादसह संपूर्ण सोलापूर जिल्हा आणि बार्शी तालुक्यातून हजारो महिला, पुरुष, पालक आणि लग्नाळू मुले आली होते. या सर्व पालक आणि मुलांना तुम्हाला आज या ठिकाणी मुलगी दाखवली जाईल, तसेच मुलगी पसंत पडताच लगेच लग्न लावून दिलं जाईल, असं सांगण्यात आल्याची माहिती आहे.

Solapur : अंडरपासमुळे झाला घात, 12 काळविटांचा मनाला चटका लावणारा अंत

यातील कित्येक पालकांचा हा तिसरा मेळावा होता. मात्र, प्रत्यक्षात या पालकांना एकदाही नवरी पाहायला मिळाली नव्हती. मार्चपर्यंत आपणास नक्की मुलगी मिळेल, असं सांगितलं जात होतं. मेळाव्यात सर्वांसमोर मुलांची नावं पुकारून बोलवलं जात होतं. बऱ्याच पालकांच्या आपली काहीतरी फसवणूक होत आहे, असं लक्षात आल्यानं त्यांनी नागरिकांना फोन करून सांगितलं. जागरुक नागरिक येताच काहीतरी गडबड आहे, या ठिकाणी लोकांच्या भावनेशी खेळून खोटी आश्वासन दाखवून फसवणूक होत असल्याची बाब लक्षात आली. त्यानंतर ही बाब पोलिसांना कळवण्यात आली.

Solapur: लग्न जमत नसल्यानं बाशिंग बांधून तरुणांचा कलेक्टर ऑफिसवर मोर्चा

या पालकांच्या आणि मुलांच्या व्हॉट्सअॅपवर काही मुलींचे बायोडाटा आणि फोटो पाठवले जात होते, मात्र २४ तासांत ते फोटो डिलीट केले जायचे. यासोबतच कित्येक पालकांना तुम्ही लग्नाच्या तयारीनिशी या तुम्हाला मुलगी पसंत पडल्यास लगेच लग्न लावून देऊ किंवा आमच्या बीड येथील अनाथ आश्रमात काही मुली आहेत, त्यादेखील आपणास दाखवू आणि आपले लग्न दाखवून देऊ, असे आमिषही दाखवले गेले होते, असा दावा केला आहे. तसंच नातेवाईकांकडून रजिस्ट्रेशन फी म्हणून प्रत्येकी हजार रुपये आणि डिपॉझिट म्हणून तीन ते दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याची बाबदेखील पुढे आली आहे.

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हे वधू-वर सुचक मंडळ हे नोंदणीकृत नाही, तसंच या मंडळाने आजपर्यंत एकही लग्न लावून दिलेले नाही. केवळ आश्वासनं दिली असल्याचे वधू-वर -मंडळ चालक असलेल्या महिलेच्या बोलण्यावरून लक्षात आलं. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ सदरची महिला आणि त्यांचे दहा-बारा एजेंट यांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये नेलं. पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती. फसवणूक झालेल्या पालकांचे जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

    follow whatsapp