शिवसेना खासदार संजय राऊत आज दुपारी घेणार असलेल्या पत्रकार परिषदेबद्दल संपूर्ण राज्यात उत्सुकता निर्माण झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप शिवसेनेतर्फे केला जात होता. संजय राऊत यांनी उप-राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल लिहीलं होतं.
ADVERTISEMENT
झुकेंगे नही असं म्हणत गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने भाजपला आव्हान दिलं आहे. त्यात आज शिवसेना भवनात होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी महत्वाचे शिवसेना नेते आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. राज्यात इतर ठिकाणीही शिवसैनिकांनी राऊत यांना समर्थन दर्शवलं आहे. सोलापुरात शिवसैनिकांनी राऊतांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी करत किरीट सोमय्यांना राऊतांच्या पायाशी दाखवलं आहे.
सोलापूरच्या मध्यवर्ती असणाऱ्या नवी पेठ परिसरात आज शिवसैनिकांनी हे आंदोलन केलं. मोदी-शहांच्या भाजप सरकारकडून सीबीआय, ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा राजकीय दबवतंत्रासाठी वापर होत आहे. केवळ भाजपेत्तर राजकीय पक्षांच्या नेत्यांना केंद्र सरकार लक्ष्य करत आहे असा आरोप संजय राऊत यांनी वारंवार केला होता आजच्या पत्रकार परिषदेत राऊत भाजपच्या साडेतीन लोकांबद्दल गौप्यस्फोट करणार असल्यामुळे भाजपचे हे साडेतीन लोकं नेमके आहेत तरी कोण याबद्दल सर्व राज्याला उत्सुकता लागली आहे.
संजय राऊतांच्या या पत्रकार परिषदेसाठी शिवसेना भावनांत जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात शिवसैनिकांकडून संजय राऊत यांना पाठींबा देत पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT