मला बळीचा बकरा बनवलं जातंय ! Eknath Khadse यांच्या जावयाचा जामिनासाठी अर्ज

पुण्याच्या भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन खरेदी प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणात ईडीने काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांचीही चौकशी केली. ईडीने गिरीश चौधरी यांची १४ दिवस चौकशी केल्यानंतर त्यांच्या वकीलांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केला आहे. Advocate मोहन टेकवडे यांनी गिरीश चौधरी यांच्यावतीने कोर्टासमोर बाजू […]

Mumbai Tak

विद्या

• 05:26 AM • 21 Jul 2021

follow google news

पुण्याच्या भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन खरेदी प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणात ईडीने काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांचीही चौकशी केली. ईडीने गिरीश चौधरी यांची १४ दिवस चौकशी केल्यानंतर त्यांच्या वकीलांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केला आहे.

हे वाचलं का?

Advocate मोहन टेकवडे यांनी गिरीश चौधरी यांच्यावतीने कोर्टासमोर बाजू मांडली. Prevention of Money Laundering Act कायद्यातील सेक्शन ३ आणि ४ गिरीश चौधरी यांना अटकेत ठेवण्यासाठी लागू होत नाहीत. हे प्रकरण मनी लाँडरिंगचं नसून चौधरी यांना राजकीय प्रकरणात बळीचा बकरा बनवलं जात आहे. ७ जुलै रोजी ईडीने चौधरी यांना अटक केली होती. चौकशीदरम्यान चौधरी यांना जे काही प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी बहुतांश प्रश्नांची उत्तर देताना ते सारखे चिडत होते अशी माहिती ईडीच्या सुत्रांनी दिली आहे. दरम्यान कोर्टाने चौधरी यांचा जामीन अर्जावर पुढील काही दिवसांत सुनावणी होईल असं म्हटलंय.

एकनाथ खडसे यांची पत्नी आणि जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील MIDC चा भूखंड विकत घेतला होता. या भूखंडाची किंमत ही ३१ कोटींच्या घरात होती. परंतू एकनाथ खडसे यांनी त्यावेळी आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करत या जमिनीची किंमत ३ कोटी करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कोर्ट या प्रकरणात काय सुनावणी करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp