नागपूर: नागपुरातील जयताळा परिसरात मुलाला पहिल्या शैक्षणिक सत्रात कमी गुण मिळाल्याने अस्वस्थ झालेल्या आईनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरातील जयताळा परिसरात सहाव्या वर्गात शिकत असलेल्या मुलाला परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुलाचे आई वडील दोघेही तणावात होते. मुलाच्या वडिलांनी मुलाची मार्कशीट बघून आईजवळ नाराजी व्यक्त केली त्यातूनच अस्वस्थ होऊन घरात विषारी गोळ्या प्राशन करून रंजना नितीन इंदरे, वय 35 वर्ष, या आईने आत्महत्या केली आहे.
ADVERTISEMENT
आईनं स्वत:ला दोषी ठरवत संपवलं जीवन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रंजना इंदरे या खाजगी कंपनीमध्ये कामाला असून त्यांचा मुलगा एका नामांकित शाळेत सहाव्या वर्गात शिकतो. अभ्यासात हुशार असलेल्या मुलाला टीव्ही आणि मोबाईल बघण्याचा छंद जडला होता त्यामुळे अभ्यासाकडे त्याचे दुर्लक्ष झाले. मुलाला पालकांच्या अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने त्याचे आई-वडील दोघेही नाराज होते.
पत्नीने मुलाला कमी मार्क मिळण्याला स्वतःलाच दोषी ठरवले, त्यातच पतीनेही तिच्यावरच राग काढल्याने रंजना नैराश्यात गेल्या त्यामुळे शनिवारी सायंकाळी पाच वाजता धान्य टाकायच्या कीटकनाशक गोळ्या खाऊन रंजनाने घरी आत्महत्या केली. प्रताप नगर पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहे.
ADVERTISEMENT