राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसतेय. अशातच राज्य सरकराने लसीकरण मोहिमेला वेग दिला आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. नुकतंच अभिनेता सोनू सूदने देखील कोरोनाची लस घेतली आहे.
ADVERTISEMENT
अभिनेता सोनू सूद याने कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला त्याने सुरुवात केलीये. या मोहिमेला सोनूने ‘संजीवनी’ असं नाव दिलं आहे.
यासंदर्भात सोनूने ट्विट केलं आहे. तो म्हणातो, “मी कोरोनाची लस घेतली आहे. आता देशाताली इतरांनी देखील लसीकरण करावं. आम्ही संजीवनी नावाची सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या मोहिनेमुळे लोकांमध्ये लसीकरणासंदर्भात जनजागृती निर्माण होईल त्याप्रमाणे लस घेण्यासाठी ही मोहीम लोकांना प्रवृत्त करेल”
ADVERTISEMENT