आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातला प्रभाकर हा आमचा साक्षीदार फुटला आहे. तो आता वीस दिवसांनी का बोलतो आहे? समीर वानखेडे यांच्यावर त्याने काही आरोप केले आहेत, तसंच कोऱ्या प्रतिज्ञापत्रावर सह्या घेतल्याचं म्हणतो आहे मात्र तो आता वीस दिवसांनी का बोलतो आहे याआधी तो काहीच का बोलला नाही? असं NCB ने म्हटल्याचं सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समजतं आहे. प्रभाकर या साक्षीदाराने त्या दिवशीची कारवाईची सगळी माहितीच मीडियासमोर आणली आहे. त्याने केलेल्या दाव्यांमुळे समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढू शकतात अशी शक्यता आहे.
ADVERTISEMENT
NCB यांच्या प्रेस रिलिजमध्ये साक्षीदार क्रमांक एक म्हणून प्रभाकर यांचं नाव आहे. आज त्यांनी मीडियासमोर येऊन मीडियाशी बातचीत केली आहे. मात्र जे दावे प्रभाकरने केले आहेत त्याचे काहीही पुरावे प्रभाकर यांच्याकडे नाहीत. त्याने साक्ष फिरवली आहे असंही एनसीबीने म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
काय म्हटलं आहे के. पी. गोसावी यांच्या बॉडीगार्डने?
किरण गोसावी हे या प्रकरणात फरार आहेत. मात्र त्यांचा बॉडीगार्ड प्रभाकर याने आज तक सोबत एक्सक्लुझिव्ह चर्चा केली आहे. यामध्ये प्रभाकर याने एका नोटरीकृत प्रतिज्ञापत्राचा उल्लेख केला आहे. कोऱ्या प्रतिज्ञापत्रावर माझ्या सह्या घेण्यात आल्या असं प्रभाकरने म्हटलं आहे. प्रभाकर हा देखील या प्रकरणात साक्षीदार आहे. त्याला साक्षीदार क्रमांक एक असं म्हटलं आहे. आपल्याला तिथे काय होणार आहे हे कळलं नव्हतं. पंचनाम्याचे कागद आहेत असं सांगून माझ्या सह्या घेण्यात आल्या आहेत असं प्रभाकरने सांगितलं आहे.
समीर वानखेडेपासून जिवाचा धोका?
या प्रकरणातील पंच के. पी. गोसावी यांना समीर वानखेडेंपासून जिवाचा धोका आहे असाही दावा प्रभाकर याने केला आहे. क्रूझवर छापा करण्याच्यावेळी मी आणि गोसावीसर सोबत होतो. समीर वानखेडे तिथे बसलेले होते. मी त्यांना फ्रँकी आणि पाण्याची बाटली दिली. मला के. पी. गोसावी यांनी असं सांगितलं थोडावेळा बाहेर जा मी तुला व्हॉट्स अप काही फोटो पाठवतो. त्या फोटोतल्या लोकांना ओळख असं सांगितलं. मला ते फोटो लगेच आले नाहीत. साधारण दीड वाजण्याच्या सुमारास आले. त्यातला पहिला फोटो हा मुनमुन धमेचाचा होता. के.पी. गोसावी त्या दिवसापासून मला भेटलेले नाहीत. मला समीर वानखेडेंपासून जिवाचा धोका आहे असंही प्रभाकरने म्हटलं आहे.
प्रभाकरच्या फोनमध्ये आहेत फोटो आणि व्हीडिओ
प्रभाकरने जेव्हा क्रूझवर छापा पडला तेव्हाचा व्हीडिओ त्याच्या फोनमध्ये शूट केला आहे. तर काही फोटोही घेतला आहे. यातल्या एका फोटोमध्ये के. पी. गोसावी त्याचा फोन घेऊन उभा आहे आणि तो फोन स्पीकर मोडवर असून तो आर्यनची कुणाशी तरी बोलणं करून देतो आहे असं दिसतं आहे.
ADVERTISEMENT