ADVERTISEMENT
दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री अनिका विक्रमनच्या नुकत्याच समोर आलेल्या फोटोंनी सर्वांना धक्का बसला.
अनिकाचे सुजलेले डोळे,चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमा पाहून लोक हैराण झाले.
अभिनेत्रीने तिच्या जखमी चेहऱ्यावर आणि शरीरावर झालेल्या गंभीर जखमा दाखवल्या.
पोस्ट शेअर करून अनिकाने तिचा एक्स बॉयफ्रेंड अनूप पिल्लईच्या काळ्या कृत्यांचे सत्य उघड केलं.
अभिनेत्रीने फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, एक्स बॉयफ्रेंडने तिची अशी वाईट अवस्था केली आहे.
एक्स बॉयफ्रेंडवर आरोप करत अनिका म्हणाली, तिला सतत धमकावलं जात आहे आणि तिच्या कुटुंबाची बदनामी केली जातेय.
अनिका पुढे म्हणाली, ‘तो माफी मागितल्यावर माफ करायचे. त्याने फसवणूक केली. आता अनूपला सोडायचं आहे. पण तो सोडायला तयार नाही.’
अनिकाला शूटला जाण्यापासून रोखण्यासाठी त्याने मारहाण केली, तिचा गळा दाबला, असा आरोपही तिने केलाय.
ADVERTISEMENT