ADVERTISEMENT
14 फेब्रुवारी म्हणजे मधुबालाची जयंती, मधुबाला ही अभिनेत्री तिच्या चिरतरूण आणि सदाबहार सौंदर्यामुळे आणि तितक्याच सुंदर अभिनयामुळे लक्षात आहे
मधुबालाने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तो काळ कृष्ण-धवल होता. तरीही तिने तो काळ खूप गाजवला आहे.
आपल्या मोहक सौंदर्याने तिने सगळ्यांनाच भुरळ घातली होती
मधुबालाचं खरं नाव मुमताज जहाँ बेगम असं आहे
1942 मध्ये आलेल्या बसंत सिनेमात मधुबालाने पहिल्ययांदा काम केलं होतं
त्यानंतर आलेल्या बेकसूर या सिनेमातून तिने आपली कारकीर्द सुरू केली. नी
महल, चलती का नाम गाडी, हावडा ब्रिज, हाफ तिकिट, नीलकमल, बसंत या सिनेमांमधल्या तिच्या भूमिका विशेष गाजल्या
मुगल-ए-आझम या सिनेमातील तिने साकारलेली अनारकलीची भूमिका आणि प्यार किया तो डरना क्या… हे गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे
किशोर कुमार आणि दिलीप कुमार या दोघांसोबत तिची जोडी विशेष गाजली
मधुबालाचं लग्न किशोर कुमारसोबत झालं होतं. मात्र तिला प्रदीप कुमार, भारत भूषण आणि दिलीप कुमार या तिघांनीही लग्नाची मागणी घातली होती
आरसपानी सौंदर्य म्हणजे काय तर ते म्हणजे मधुबाला होती
वयाच्या 36 व्या वर्षी तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. 1969 मध्ये मधुबालाने जगाचा निरोप घेतला
मधुबालाचं नाव सिनेसृष्टीत सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं आहे, तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे दाखले आजही दिले जातात.
पुन्हा मधुबाला होणे नाही… असंही तिच्याबाबतीत म्हटलं जातं आणि ते तितकंच खरंही आहे
ADVERTISEMENT