ब्रम्हाणी रुपात कोल्हापूरच्या अंबाबाईची पहिली पूजा

मुंबई तक

• 02:07 PM • 07 Oct 2021

घटस्थापनेच्या मुहुर्तावर आजपासून राज्यात मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाईची आजची पुजा ही ब्रम्हाणी रुपात करण्यात आली आहे. मातृका देवता या जल मातृका, स्थल मातृका इत्यादी प्रकारच्या आहेत. या मातृकांची विवाहादी मंगल कार्यामध्ये समूहामध्ये पूजन केले जाते. यांना सप्तमातृका म्हणतात. या विविध देवतांच्या शक्ती रूपी तत्व देवता अहित. याचे वर्णन सप्तशती ग्रंथामध्ये आहे. […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

घटस्थापनेच्या मुहुर्तावर आजपासून राज्यात मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत.

कोल्हापूरच्या अंबाबाईची आजची पुजा ही ब्रम्हाणी रुपात करण्यात आली आहे.

मातृका देवता या जल मातृका, स्थल मातृका इत्यादी प्रकारच्या आहेत. या मातृकांची विवाहादी मंगल कार्यामध्ये समूहामध्ये पूजन केले जाते. यांना सप्तमातृका म्हणतात.

या विविध देवतांच्या शक्ती रूपी तत्व देवता अहित. याचे वर्णन सप्तशती ग्रंथामध्ये आहे. असुरांच्या वधावेळी विविध देवतांनी आपापली शक्ती वापरून या देवतांना निर्माण केले.

ज्या देवाचे जे रूप आहे भूषण, वाहन, शस्त्रे, अलंकार आहेत, तशाच रूपामध्ये फक्त स्त्री रूपात, देवता असुरांशी युदध करण्यासाठी आल्या.

आज प्रथम मातृका ब्रह्माणी | ब्राह्मी या रूपात श्री महालक्ष्मी – अंबाबाईची पुजा बांधण्यात आली आहे. ब्रम्हाणी ही ब्रम्हदेवाची शक्ती आहे. ही चार मुख असणारी व चर्तुभूज आहे

ही पूजा श्रीपूजक चेतन चौधरी व लाभेश मुनिश्वर यांनी बांधली. संबंधित बातमीसाठी इथे क्लिक करा

    follow whatsapp