–वसंत मोरे
ADVERTISEMENT
पुणे: शिवसेनेत सुरू झालेल्या बंडाचे सत्र सुरू असतानाच आता राष्ट्रीय समाज पक्षात देखील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये उभी फूटपडली आहे. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बारामती येथे आज बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्षमहादेव जानकर यांच्या हुकुमशाही पद्धतीला कंटाळून त्यांची साथ सोडण्याचा निर्णय या पदाधिकाऱ्यांनी घेतला. या बैठकीला 22 जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय समाज पक्षामध्ये धुसपुस सुरू असल्याची चर्चा सुरू होती. आज झालेल्या बैठकीत ही खदखद बाहेर पडली असल्याचे चित्र आहे. आज बारामती तालुक्यातील उंडवडी येथे झालेल्या एल्गार परिषदेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचेराष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या विचारसरणीला बाजूला ठेवत कार्यकर्त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले त्यामध्ये धनगरआरक्षणाचा लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय धनगर समाजाचे प्रश्न यशवंत सेनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पक्षाचे नेतृत्व कार्यकर्त्यांना हीन वागणूक देत असल्याने त्याला कंटाळून आम्ही त्यांचे साथ सोडण्याचा निर्णय घेतलाआहे. मात्र राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि त्यातून उभा राहिला आहे. त्यामुळे यापुढे पक्षावरआमचाच हक्क आहे. पक्षावर आमचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी कायदेशीर लढाई देखील लढण्याची तयारी असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT