डोंबिवली: क्रीडा प्रशिक्षकाकडून विद्यार्थिनीला अमानुष मारहाण, शारिरीक अत्याचार केल्याचं उघड

मुंबई तक

27 Apr 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:07 AM)

डोंबिवलीत गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. मानपाडा परिसरात राहणाऱ्या एका क्रीडा प्रशिक्षकाने आपल्याच विद्यार्थिनीला अमानुष मारहाण केली आहे. पोलिसांनी याप्रकरणात आरोपी प्रशिक्षक रामेश्वर पाठक याला अटक केली आहे. डोंबिवलीत राहणारी 27 वर्षीय पीडित तरुणी, 2012 साली शाळेत असताना एका राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गेली होती. त्यावेळी तिचे कोच असलेल्या रामेश्वर पाठक याने पीडित […]

Mumbaitak
follow google news

डोंबिवलीत गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. मानपाडा परिसरात राहणाऱ्या एका क्रीडा प्रशिक्षकाने आपल्याच विद्यार्थिनीला अमानुष मारहाण केली आहे. पोलिसांनी याप्रकरणात आरोपी प्रशिक्षक रामेश्वर पाठक याला अटक केली आहे.

हे वाचलं का?

डोंबिवलीत राहणारी 27 वर्षीय पीडित तरुणी, 2012 साली शाळेत असताना एका राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गेली होती. त्यावेळी तिचे कोच असलेल्या रामेश्वर पाठक याने पीडित तरुणीशी ओळख वाढवत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. या दोघांमधले नातेसंबंध व्यवस्थित सुरु असताना 2019 नंतर दोघांमध्ये खटके उडायला लागले. पीडित तरुणी दुसऱ्या मुलांशी बोलते म्हणून रामेश्वर तिला मारहाण करायला लागला.

Crime: बहिणीचा फोटो काढल्याने राग अनावर, अल्पवयीन मुलाकडून मित्राची हत्या

18 मार्च 2022 रोजी रामेश्वरने अशाच एका कारणावरुन लोखंडी रॉडने पीडित मुलीला अमानुष मारहाण केली. इतकच नव्हे तर त्याने तरुणीवर शारिरिक अत्याचार करत तुझे अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. यानंतर तरुणीने आपल्या एका मित्राच्या सहाय्याने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी रामेश्वर पाठकविरोधात बलात्कार, गंभीर मारहाण आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

सातारा: पाच महिन्याच्या बाळाची आईकडून हत्या, मृतदेह पुरला; 12 दिवसांनी पोलिसांना दिली माहिती

    follow whatsapp