आरोपीला पळवून नेण्यासाठी पोलीस ठाण्यावर दगडफेक, धुळ्यातील दोंडाईचा येथील घटना

मुंबई तक

• 04:24 AM • 01 Apr 2021

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना पहायला मिळाली. एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणात दोन गटांमध्ये तेढ निर्माण झाली. या प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यातही घेतलं. परंतू आरोपीची सुटका करण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गदारोळ घातला. काही वेळाने ही परिस्थिती […]

Mumbaitak
follow google news

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना पहायला मिळाली. एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणात दोन गटांमध्ये तेढ निर्माण झाली. या प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यातही घेतलं. परंतू आरोपीची सुटका करण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गदारोळ घातला. काही वेळाने ही परिस्थिती हाताबाहेर जायला लागली.

हे वाचलं का?

आरोपीच्या नातेवाईकांनी यावेळी पोलीस ठाण्यावर दगडफेक करायला सुरुवात केली…त्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या गोळीबारानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं, मात्र या वेळी पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन आरोपीच्या नातेवाईकांनी त्याला पोलीस स्टेशनमधून पळवून नेलं. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर दोंडाईचा उप-जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

या घटनेनंतर दोंडाईचा शहरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला आहे. पोलीस ठाण्यातून पळवून नेलेल्या आरोपीचा सध्या पोलीस शोध घेत असून पोलीस ठाण्यात दगडफेक करणाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    follow whatsapp