नागपूर: नागपुरात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर 15 ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज (11 मार्च) पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT
दुसऱ्यांदा करण्यात आलेला हा लॉकडाऊन संपूर्ण नागपूर शहरासाठी असणार आहे. सध्या नागपूर शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने आता नागपूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये हा लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी 11 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण नागपुरात सापडला होता.
15 ते 21 मार्चदरम्यान कडक लॉकडाऊन असल्याने यावेळी सामान्य नागरिकांसाठी संचारबंदी असणार आहे. यावेळी पोलिसांनी कडक अंमलबजावणी करावी असे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
नागपूरमध्ये लॉकडाऊन काळात काय सुरु, काय बंद राहणार?
दरम्यान, 15 मार्चपासून नागपूरमध्ये कठोर लॉकडाऊन लागू करणार आहे. जाणून घ्या यादरम्यान नेमकं काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार.
-
कोरोनावरील लसीकरण केंद्र सुरु राहणार आहेत, त्यामुळे लस घेण्यासाठी पात्र असलेल्यांना दिलेल्या वेळेनुसार बाहेर पडता येणार आहे.
-
लॉकडाऊनमध्ये उद्योग एमआयडीसी सुरू राहतील
-
सरकारी कार्यालयं 25 टक्के उपस्थितीमध्ये सुरू राहतील.
-
अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
-
यामध्ये भाजी, दूध, याचा नागरिकांना पुरवठा नेहमी प्रमाणेच राहणार आहे.
-
याशिवाय दवाखाने, बँक, मीडियाशी संबंधित लोकांना कामानिमित्त बाहेर पडण्यास मुभा असेल.
-
मद्याची दुकाने बंद असतील. मात्र ऑनलाइन विक्री सुरु असणार आहे.
अमरावतीत लॉकडाऊन, पालकमंत्री यशोमती ठाकूरांची घोषणा
हा लॉकडाऊन 21 मार्चपर्यंत असणार आहे. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये वाढ करायची की नाही याबाबत समीक्षा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देखील नितीन राऊत यांनी दिली आहे.
वर्षभरापूर्वी आजच नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्णाला सापडला होता. तेव्हा पासून आतापर्यंत 1 लाख 62 positive रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 215 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मधल्या काळात स्थिती नियंत्रणात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे पालकमंत्री नितीन राऊत यांनी स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेतल्यानंतर लॉकडाऊनचा निर्णय घेतला.
नागपूर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. शिवाय काही ग्रामीण भागात ही रुग्ण सापडत असल्याची माहिती राऊतांनी दिली आहे.
नाशिकमध्येही अंशत: लॉकडाऊन, नाशिककरांवर काय असणार निर्बंध?
नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या का वाढतेय?
कोरोना रुग्णांची संख्या नेमकी का वाढत आहे? याबाबत जेव्हा पालकमंत्र्यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, काही ठिकाणी बाधित रुग्ण बाहेर फिरत आहेत. तसेच अनेक ठिकाणी आयसोलेशनच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. त्यामुळे हे संक्रमण वाढत आहे.
ADVERTISEMENT