नागपुरात 31 मार्चपर्यंत कडक निर्बंध कायम राहणार: नितीन राऊत

मुंबई तक

• 10:34 AM • 20 Mar 2021

नागपूर: नागपुरात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आणि होत असलेले मृत्यू याबाबत नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. याच बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी नागपुरात 31 मार्चपर्यंत कडक निर्बंध लागू असणार असल्याची आज (20 मार्च) घोषणा केली आहे. यावेळी नितीन राऊत यांनी लॉकडाऊन शब्दाचा उच्चार टाळत कडक निर्बंध 31 मार्चपर्यंत असतील असे स्पष्ट केले. कोरोनाच्या […]

Mumbaitak
follow google news

नागपूर: नागपुरात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आणि होत असलेले मृत्यू याबाबत नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. याच बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी नागपुरात 31 मार्चपर्यंत कडक निर्बंध लागू असणार असल्याची आज (20 मार्च) घोषणा केली आहे. यावेळी नितीन राऊत यांनी लॉकडाऊन शब्दाचा उच्चार टाळत कडक निर्बंध 31 मार्चपर्यंत असतील असे स्पष्ट केले.

हे वाचलं का?

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागपुरात 15 ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. यासंबंधी 11 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन नितीन राऊत यांनी घोषणा केली होती. मात्र, आता 31 मार्चपर्यंत नागपूरकरांना कडक निर्बंध पाळावे लागणार आहेत.

दरम्यान, अशाच प्रकारची मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. नागपुरात पूर्ण लॉकडाऊन न लावता निर्बंध कडक करण्यात यावे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी बैठकीत केली होती. त्याचा विचार करता पालकमंत्र्यांनी आता नागपुरात निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी सर्वसामान्यांना काही गोष्टींमध्ये सूट मिळण्याची शक्यता आहे.

उप-राजधानीला कोरोनाचा विळखा कायम ! दिवसभरात ३ हजार २३५ नवे रुग्ण

नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक आज पार पडली. बैठकीला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, नागपूर जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नागपुरात कोरोनामुळे होत असलेले मृत्यू आणि वाढत असलेले रुग्ण तसेच खाजगी रुग्णालयांचे रुग्णांना येत असलेले भरमसाठ बिल यावर देखील बैठकीत चर्चा करण्यात आली.

तसेच नागपूर जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवणं यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नागपुरात 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. याची मुदत उद्या म्हणजेच 21 मार्चला संपणार आहे. पण आता उद्यापासून नागपूरकरांवर कडक निर्बंध असणार आहे.

लॉकडाऊन वाढवायचा की नाही यावर या बैठकीत चर्चा झाली. पण सर्व बाबींचा विचार करुन नितीन राऊतांनी कडक निर्बंध कायम राहतील अशी माहिती दिली आहे.

पालकमंत्री नितीन राऊत यांनी लावलेल्या लॉकडाऊनमध्ये विश्वासात घेतले नसल्याचा आरोप भाजप आणि व्यापारी संघटनांनी लावला होता. त्यामुळे आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत स्थानिक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी यांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले होते.

मधल्या काळात नागपूरमध्ये स्थिती नियंत्रणात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे 15 ते 21 मार्चपर्यंत नागपूरमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता.

नागपूर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत होती. शिवाय काही ग्रामीण भागात ही रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. मात्र, आता या लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता पाहायला मिळू शकते.

राज्यात रुग्णवाढीचा आलेख वाढताच…२५ हजाराहून अधिकांना कोरोनाची लागण

नितीन राऊतांच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे:

  • कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत.

  • निर्बंध लावताना नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल

  • लसीकरण केंद्र वाढविले जात आहे

  • 20 हजारदर दिवशी लसीकरण केलं जातं आहे ते 40 हजारवर नेण्याचा लक्ष्य आहे

  • भाजीपाला 4 वाजेपर्यंत सुरू राहील

  • गर्दी करणाऱ्यांवर कठोर कारवाई

  • थोक व्यापारी आणि दुकानं 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

  • शाळा पूर्णपणे बंद राहतील

  • जीवनावश्यक वस्तूची कमतरता राहणार नाही

  • परीक्षा कोविड नियमांचं पालन करून घेतल्या जातील

  • परिस्थिती गंभीर आहे मात्र लॉकडाऊन पर्याय नाही. पण जनतेने नियमांचं पालन करावं

  • बाजार बंद राहील, फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहतील

  • 15 ते 21 पर्यंत कडक निर्बंध लावले होते

  • आज सर्वपक्षीय बैठक घेतली

  • नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अनेक सूचना केल्या

  • कडक निर्बंध 31 मार्चपर्यंत लागू राहतील

  • रुग्णांचा ग्राफ वाढत आहे.

    follow whatsapp