मिथिलेश गुप्ता, डोंबिवली
ADVERTISEMENT
ठाणे रायगड जिल्ह्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या खिडकाळी गावच्या प्राचीन खिडकाळेश्वर मंदिराच्या आवारात मासे मेल्याची बातमी पसरताच मोठ्या प्रमाणात स्थानिकांनी गर्दी केली होती.
ठाणे महापालिकेने आपल्या हद्दीत असलेल्या तलावाची काळजी घेतली असती तर हा मोठा अनर्थ टळला असता. मृत माश्यांचा खच पडला असल्याची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तलाव परिसरात भेट दिली आहे.
डोंबिवलीजवळ असलेल्या प्राचीन शिवमंदिराच्या आवारात एक प्राचीन तलाव आहे. या तलावात वेगवेगळ्या प्रकारचे मासे नागरिकांना पाहावयास मिळत असतात. ग्रामीण भागातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या खिडकाळेश्वर मंदिराच्या आवारात प्राचीन तलाव आहे.
मात्र, प्रशासनाने या तलावाकडे दुर्लक्ष केल्याने दोन दिवसांपासून या तलावातील मासे मृत्यूखी पडत होते. मात्र शनिवारी सकाळच्या सुमाराला स्थानिक मंदिराच्या आवारात गेले असता मेलेल्या माश्यांचा भला मोठा खच पाहून स्थानिकांनी तात्काळ नगरसेवक बाबाजी पाटील यांना फोन करून यासंबंधी माहिती दिली. पाटील यांनी महापालिकेच्या संबंधित यंत्रणेला माहिती देऊन अधिकाऱ्यांना प्रचारण केले आणि या तलावातील मेलेल्या माश्यांचा खच बाहेर काढायला सुरुवात केली.
खिडकाळेश्वर मंदिराच्या आवारात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याने माश्यांवर पालिका यंत्रणांडून पावडरची फवारणी केली जात होती. मात्र एवढे मासे मेले कसे? असा प्रश्न सध्या स्थानिकांना पडला आहे.
डोंबिवली-शिळफाटा मार्गावर असलेल्या शिवमंदिरात मोठ्या प्रमाणात भक्त ठाणे, रायगड तथा डोंबिवली आदी परिसरातून येत असतात. या तलावातील मासे हे भक्तांचे करमणूक करण्याचे साधन होते. मंदिरात दर्शनासाठी आलेले भक्त हे मासे पाहताना आपला सायंकाळच्या वेळ घालवत असत मात्र अचानक माश्यांचा झालं तरी काय असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.
वसईत बीचवर सापडला भला मोठा व्हेल मासा
या तलावात मोठं मोठे मासे, कासव आहेत. मात्र माश्यांना पाण्यामध्ये काही शिजलेले पदार्थ टाकल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता चौकशी होणार का आणि कारवाई कधी होणार असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत.
ADVERTISEMENT