ADVERTISEMENT
बहिणभावाचं नातं समृद्ध करणारा सण म्हणजे रक्षाबंधन! रविवारी देशभरात रक्षाबंधन साजरं झालं.
अनेकांनी आपापल्या घरी पार पडलेल्या रक्षाबंधनाचे क्षण सोशल मीडियावर शेअर केले.
अभिनेत्री सनी लिओनीच्या घरीही रक्षाबंधन साजरं झालं.
सनी लिओनीने रक्षाबंधनाचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.
सनी लिओनीने आपल्या तिन्ही मुलांसोबत रक्षाबंधन साजरं केलं.
त्याचबरोबर डिझायनर हितेंद्र कपोपोराही आणि सेलिब्रेटी हेअर स्टाईलिस्ट जिती हेही सनीच्या घरी आले होते.
या खास क्षणी तिच्या घरी युसूफ इब्राहीम देखील उपस्थित होते.
रक्षाबंधनानिमित्तचे फोटो सनीने शेअर केले असून, घरी साजरी झालेलं रक्षाबंधन असं कॅप्शनही दिलं आहे.
सनी लिओनीच्या मुलीने यावेळी सगळ्यांना राखी बांधली.
सनीने मेकअप आर्टिस्ट तोमस मोका याला राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं.
ADVERTISEMENT