Suresh Dhas : सुरेश धस यांनी आज मस्साजोग गावात जाऊन धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीड पोलिसांच्या भूमिकेवरुन गंभीर आरोप करत धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यासमोर काही मागण्या ठेवल्या, ज्यावर सुरेश धस यांनी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हे प्रश्न मांडणार असल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Suresh Dhas मस्साजोगमध्ये, धनंजय देशमुख म्हणाले पोलिसांनी हात झटकले, आरोपी त्यांचा मित्र...
"मसाजोग ग्रामस्थांनी माझ्यावर हात वर करून विश्वास दाखवला आहे. या प्रकरणातील महाजन आणि पाटील या अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं पाहिजे ही मागणी आहे. सायबर सेलमधील दोन तज्ञांची एसटीमध्ये नियुक्ती व्हावी या मागण्या" असल्याचं धसांनी सांगितलं. तसं आरोपींचे फोन कॉल कुणाला झाले आहेत हे तपासले पाहिजे. मागील दोन महिन्यांपूर्वीचे सीडीआर तपासले पाहिजेत असं सुरेश धस म्हणाले आहेत.
पोलीस अधिकारी महाजन यांची नियुक्ती बीडमध्ये आहे, त्यांचं कामकाज केज पोलीस ठाण्यात कसं काय चालतं? या पोलिसांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे असं सुरेश धस म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले,आरोपींचं मनोबल वाढविण्यासाठी लोक न्यायालयात येतात. कृष्णा हा फार शातीर आहे, त्याला अटक करणं गरजेचं आहे असं धस म्हणालेत.
हे ही वाचा >>Raj Thackeray यांच्या भेटीसाठी उदय सामंत 'शिवतीर्थ'वर, महापालिकेच्या पार्श्वभूमीवर हालचाली?
रमेश घुले, दत्ता बिक्कड, दिलीप गीते, गोरख फड यांचे सीडीआर तपासणी करून सह आरोपी करा. शासकीय वकील उज्वल निकम यांची यात नियुक्ती करावी, अशा मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली असल्याचं धसांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले, हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात नक्की होणार. चार्जशीट दाखल करण्यापूर्वी ग्रामस्थांनी 8 मागण्या मांडल्या आहेत. सोमवार पर्यंत मागण्यांवर मान्य झाल्या तर ग्रामस्थांचा विश्वास वाढेल. त्यामुळे या मागण्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे असं धसांनी माध्यमांसमोर सांगिचतलं आहे.
ADVERTISEMENT
