सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप; NCB ने आरोपपत्रात काय म्हटलंय?

विद्या

• 06:58 AM • 13 Jul 2022

सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता दिसत आहेत. या प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने आरोप निश्चित केले असून, अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह ३४ आरोपींवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या प्रकरणात रिया चक्रवर्तीसह ३४ जणांविरुद्ध उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये आणि बॉलिवूडमधील लोकांना ड्रग्ज पुरवल्याचा आरोप लावला आहे. […]

Mumbaitak
follow google news

सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता दिसत आहेत. या प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने आरोप निश्चित केले असून, अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह ३४ आरोपींवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या प्रकरणात रिया चक्रवर्तीसह ३४ जणांविरुद्ध उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये आणि बॉलिवूडमधील लोकांना ड्रग्ज पुरवल्याचा आरोप लावला आहे. यातच मयत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यालाही नशा करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोपही लावण्यात आला आहे.

रिया चक्रवर्तीवर (Rhea Chakraborty) एनसीबीने (NCB) कोणते आरोप लावलेत?

एनसीबीने रिया चक्रवर्तीविरुद्ध आरोप लावले आहेत की, तिने अभिनेता सुशांत सिंह राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी केले आणि त्याचे पैसेही तिने दिले. एनसीबीने ३४ आरोपींविरुद्ध ३८ आरोप केले आहेत.

एनसीबीने आरोपपत्रात दावा केला आहे की, रिया चक्रवर्तीने सॅम्युअल मिरांडा, शोविक चक्रवर्ती, दीपेश सावंत आणि दुसऱ्या व्यक्तींकडून अनेकदा गांजा खरेदी केला. गांजा खरेदी केल्यानंतर रिया चक्रवर्तीने तो सुशांत सिंह राजपूतला दिला.

रिया चक्रवर्तीने मार्च २०२० पासून ते सप्टेंबर २०२० पर्यंत गांजा खरेदीचे पैसे दिले आहेत. आरोपपत्रातील माहितीनुसार रिया चक्रवर्तीने एनडीपीएस कायद्याच्या १९८५ मधील कलम ८ (क)सह २० (ब) (२) अ, २७अ, २८, २९ आणि ३० नुसार गुन्हा केला आहे, असा एनसीबीचा आरोप आहे.

रिया चक्रवर्तीसह ३५ आरोपींचा गुन्ह्यात सहभाग

एनसीबीच्या आरोपपत्रानुसार रिया चक्रवर्तीसह ३५ आरोपी हे मार्च २०२० ते सप्टेंबर २०२० दरम्यान झालेल्या गुन्ह्यात सहभागी होते. या काळात ते अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीसह इतर शहरांत पुरवठा आणि बॉलिवूड आणि उच्चभ्रू सोसायटीतील लोकांना ड्रग्ज पुरवत होते. विनापरवाना मुंबई महानगर क्षेत्रात अंमली पदार्थांची तस्करी करत होते. त्याचबरोबर आरोपी गांजा, चरस, एलएसडी, कोकेनचं सेवन करत होते, हे करणं गुन्हा आहे, असंही एनसीबीने म्हटलं आहे.

शोविक चक्रवर्ती ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात

रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती हा ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात होता. तो गांजा, चरस/हशीश हे पुरवण्याच्या ऑर्डर घ्यायचा. शोविक अब्देल बासित, कैझान इब्राहिम, कर्मजीत सिंह आनंद आणि सूर्यादीप मल्होत्रा यांच्यासह इतर लोकांकडून गांजा घेऊन सुशांत सिंह राजपूतला द्यायचा. अंमली पदार्थ घेण्यासाठी कधी त्याने स्वतः, तर कधी रिया चक्रवर्तीने पैसे दिले, असंही एनसीबीने म्हटलं आहे.

सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) मित्र सिद्धार्थ पिठाणीही अडचणीत?

सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीच्याही अडचणी वाढल्या आहेत. एनसीबीने पिठाणीवर आरोप लावला आहे की, आरोपी सॅम्युअल मिरांडा, शोविक चक्रवर्ती, दीपेश सावंत, रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यासोबत ड्रग्ज/गांजा यांची खरेदी विक्री करण्यासाठी संपर्कात असायचा. सुशांत सिंह राजपूत आणि इतरांना सेवन करण्यासाठी जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२० पर्यंत गांजा खरेदी केला गेला. याच्या नोंदी बँकेत पूजेचं साहित्य म्हणून दाखवल्या गेल्या. अशा पद्धतीने सुशांत सिंह राजपूतला ड्रग्जची सवय लावली गेली, असं एनसीबीने म्हटलं आहे.

    follow whatsapp