ADVERTISEMENT
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींमध्ये सुष्मिता सेनचं नाव घेतलं जातं.
सुष्मिता सेन ही तिच्या लव्ह अफेअरमुळे चर्चेत आली होती. मात्र, आता एका गंभीर गोष्टीमुळे ती चर्चेत आली आहे.
सुष्मिताला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता याबाबत सोशल मीडियावर तिने माहिती दिली आहे.
सुष्मिता सेनची ही पोस्ट समोर येताच व्हायरल झाली आहे. तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिने ही पोस्ट शेअर केली.
इंस्टा पोस्टमध्ये सुष्मिताने तिच्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली आहे.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.
‘मी माझ्या हितचिंतकांना आणि प्रियजनांना ही चांगली बातमी सांगू इच्छिते की सर्व काही ठीक आहे आणि मी पुन्हा नव्या आयुष्यासाठी तयार आहे.’ असं सुषमिता पुढे म्हणाली.
ADVERTISEMENT