महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक आणि पंजाब दहशतवादी विरोधी पथक यांनी संयुक्त कारवाई करून एका दहशतवाद्याला शिर्डीतून अटक केली आहे. पंजाबमधल्या राजिंदर या दहशतवाद्याला शिर्डीतून अटक करण्यात आली आहे. १६ ऑगस्टला पंजाब पोलीस दलातील पोलीस निरीक्षकाच्या वाहनाला IED लावून ती स्फोटात उडवण्याचा कट त्याने आखला होता असा आरोप आहे. पंजाब आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त कारवाई करत या दहशतवाद्याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
राजिंदर या दहशतवाद्याला एटीएसने संयुक्त कारवाई करत केली अटक
१६ ऑगस्ट रोजी पंजाब पोलिसांच्या पीएसआयच्या गाडीला एलईडी (IED) लावून उडवण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला होता. त्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी आणि महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत राजेंदरला बेड्या ठोकल्या. आरोपीला पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले असून अधिक तपास सुरू आहे. याबाबतची आणखी सविस्तर माहिती लवकरच पाेलिस दल देणार आहे.
मुंबईत 26/11 सारखा हल्ला घडवण्याची धमकी आजच
मुंबईच्या वाहतूक नियंत्रण विभागाला आजच व्हॉट्स अॅप नंबरवर एक धमकी देण्यात आली आहे. या धमकीत मुंबईत पुन्हा २६/११ सारखा घडवला जाईल सहा दहशतवादी या हल्ल्यात सहभागी होतील या आशयाची एक धमकी देण्यात आली आहे. ही धमकी ज्या नंबरवरून देण्यात आली तो पाकिस्तानशी संबंंधित आहे असंही समजतं आहे. त्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. अशात एक दहशतवादी पकडला गेल्याने खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT