निवृत्त लष्करी अधिकाऱ्यासाठी स्विगी बॉय ठरला देवदूत, ट्रॅफिकमध्ये दुचाकीवरुन पोहचवलं रुग्णालयात

मुंबई तक

• 08:01 AM • 08 Feb 2022

अनेकदा रस्त्यात एखाद्या अपघातादरम्यान जखमी झालेल्या लोकांना तसंच सोडून निघून जाणाऱ्या माणसांबद्दल आपण ऐकत असतो. अशावेळी माणुसकी संपत चालली आहे का? असा प्रश्न पडतो. परंतू मुंबई शहर प्रत्येकवेळी, अशा घटनांमध्ये आपलं वेगळेपण दाखवून देतं. काही दिवसांपूर्वी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या, अस्वस्थ वाटणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला स्विगी डिलीव्हरी बॉयने आपल्या दुचाकीवर बसवून हॉस्पिटलपर्यंत सोडलं आहे. मृणाल किरदत असं […]

Mumbaitak
follow google news

अनेकदा रस्त्यात एखाद्या अपघातादरम्यान जखमी झालेल्या लोकांना तसंच सोडून निघून जाणाऱ्या माणसांबद्दल आपण ऐकत असतो. अशावेळी माणुसकी संपत चालली आहे का? असा प्रश्न पडतो. परंतू मुंबई शहर प्रत्येकवेळी, अशा घटनांमध्ये आपलं वेगळेपण दाखवून देतं. काही दिवसांपूर्वी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या, अस्वस्थ वाटणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला स्विगी डिलीव्हरी बॉयने आपल्या दुचाकीवर बसवून हॉस्पिटलपर्यंत सोडलं आहे.

हे वाचलं का?

मृणाल किरदत असं या डिलीव्हरी बॉयचं नाव असून तो सांताक्रुझ भागातला रहिवासी आहे. स्विगीने या संपूर्ण घटनेची माहिती आपल्या इन्स्टाग्राम पेजवर दिली आहे.

मृणालने ज्या वृद्ध व्यक्तीला मदत केली ते भारतीय लष्कराचे निवृत्त कर्नल मोहन मलिक आहेत. त्यांची प्रकृती आता पूर्णपणे बरी असून त्यांनी या घटनेनंतर आपल्यासाठी धावून येणाऱ्या मृणालचे आभार मानले आहेत.

ख्रिसमसच्या दिवशी निवृत्त कर्नल मलिक यांची तब्येत खराब झाली होती. यानंतर मलिक यांच्या मुलाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचं ठरवलं. परंतू रुग्णालयात पोहचत असताना ट्रॅफिकमध्ये तो अडकला. वडिलांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये दाखल करता यावं यासाठी त्याने वाटेत काही दुचाकीस्वारांना थांबवून लिफ्टही मागितली, परंतू कोणीही त्याची मदत केली नाही.

यावेळी मृणालने मलिक यांच्यासाठी देवदूतासारखा धावून आला आणि त्याने कर्नल मलिक यांना आपल्या दुचाकीवरुन लिलावती रुग्णालयात दाखल केलं. ट्रॅफिकमधून वाट काढत, समोरील वाहनांना बाजूला होण्यासाठी आवाहन करत मृणालने मलिक यांना रुग्णालयात दाखल केलं. मृणालच्या या कामगिरीमुळे मलिक यांच्यावर वेळेत उपचार करण्यात डॉक्टरांना यश आलं आणि त्यांना जीवदान मिळालं.

तब्येत बरी झाल्यानंतर मलिक यांनी मृणालबद्दल चौकशी करुन त्यांचे आभार मानले. यावेळी मलिक यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून मृणाल हा माझ्यासाठी तारणहारासारखा धावून आल्याचं सांगत त्याचे आभार मानले.

    follow whatsapp