Tapsee Pannu vs Kangana Ranaut : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि तापसी पन्नू (Tapsee Pannu) या अशा अभिनेत्रींपैकी एक आहेत, ज्या त्यांच्या डॅशिंग व्यक्तिमत्त्वामुळे चर्चेत असतात. आजपर्यंत कंगना आणि तापसीने अनेक अॅक्शन चित्रपट केले आहेत. त्यामुळे त्यांचं बोल्ड व्यक्तिमत्त्व सर्वांच्याच पसंतीस उतरतं. पण, सध्या दोघींमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कंगना रणौतने तापसी पन्नूवर टीका केली. कंगना तापसीला सस्ती कॉपी असं म्हणाली होती.
ADVERTISEMENT
नित्यानंदच्या कैलासाने अमेरिकेतील 30 शहारांना गंडवलं, प्रकरण काय?
कंगनासोबत तापसीने असं काय केलं? ज्यामुळे कंगना तिच्यावर भडकली. कंगनाने तापसीवर केलेल्या या कमेंटमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. काहीजणांनी कंगनाच्या या वक्तव्यावर नाराजगी व्यक्त केली.
सस्ती कॉपी’ म्हणाऱ्या कंगनाला तापसी काय म्हणाली?
एका कार्यक्रमात अभिनेत्री तापसी पन्नूने हजेरी लावली होती. यावेळी तिने बॉलिवूडमधील अनेक आतल्या गोष्टी सांगितल्या. तापसी शाहरुख खानच्या पठाण ते बॉलिवूडशी संबंधित अनेक वादांबद्दल बोलली. तिने तिचा मित्र आणि चित्रपट निर्माता अनुराग कश्यपशी संबंधित अनेक मजेदार किस्सेही सांगितले. तापसी पन्नू अभिनेत्री कंगना रणौतसोबत सुरू असलेल्या वादाबद्दलही बोलली. तिला असा प्रश्न विचारण्यात आला की, ‘जर कंगनाला भेटली तर काय करणार?’
“इतके दिवस आपण समजत होतो मुख्यमंत्री सर्वोच्च”, अजित पवारांनी छेडला राजीनाम्याचा मुद्दा
यावर तापसी म्हणाली, ‘ती बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे आणि मला कंगनाने स्वस्त कॉपी म्हणण्याला काहीच हरकत नाहीये. सुरुवातीच्या टप्प्यात अशा कमेंट्सने मला फरक पडला होता, पण आता मी अशा गोष्टींनी विचलित होत नाही.’
तापसी पुढे म्हणाली, ‘मला कंगनाचा रणौतची कसलीच अडचण नाहीये, तिला माझी अडचण आहे. जर ती मला कुठे दिसली तर मी नक्कीच तिच्याशी बोलेन. मी तिच्याकडे पाठ फिरवणार नाही. मला कुठे तिची अडचण आहे तिला माझी अडचण आहे, त्यामुळे ती तिची मर्जी असेल. जेव्हा मला ती असं म्हणाली तेव्हा धक्का बसला. पण मी ते प्रशंसा म्हणून घेतलं कारण, कंगना एक चांगली अभिनेत्री आहे.’
ADVERTISEMENT