पणजी: तेहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या सर्व आरोपावरून निर्दोष मुक्तता झाली आहे. तरुण तेजपाल यांच्या महिला सहकाऱ्याने त्यांच्याविरोधात हे सर्व आरोप लावले होते. या प्रकरणी तब्बल 8 वर्षांपासून कोर्टात सुनावणी सुरु होती. अखेर आज (21 मे) गोव्याच्या म्हापुसा सत्र न्यायालयाने निर्णय देत तरुण तेजपाल हे निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. कोर्टाचा हा निकाल तरुण तेजपाल यांच्यासाठी मोठा दिलासा ठरला आहे.
ADVERTISEMENT
तरुण तेजपाल यांनी आपल्यासोबत लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्या एका कनिष्ठ महिला सहकाऱ्याने केला होता. ज्यामुळे तरुण तेजपाल यांना अटकही करण्यात आली होती. दरम्यान, मे 2014 पासून ते जामिनावर सुटले होते.
बलात्काराचा आरोपी टॅटूमुळे का सुटला ?
संपादक तरुण तेजपाल यांच्यावर लैंगिक छळ आणि बलात्काराचे आरोप करण्यात आल्यानंतर त्यांच्याविरोधात गोवा पोलिसात नोव्हेंबर 2013 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तरुण तेजपाल यांना अटकही करण्यात आली होती. गोवा पोलिसांनी त्यांच्याविरोधात फेब्रुवारी 2014 मध्ये तब्बल 2486 पानांची चार्जशीट दाखल केली होती. दरम्यान, याप्रकरणी कोर्टाकडून मे 2014 मध्ये त्यांना कोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता.
‘बलात्कार पीडितेशी लग्न करणार का?’ कोर्टाचा जळगावच्या आरोपीला सवाल
कोणत्या कलमांतर्गत सुरु होता खटला?
पत्रकार तरुण तेजपाल यांच्याविरोधात आयपीसी कलम 342 (चुकीचा पद्धतीने रोखणे), 342 (चुकीच्या पद्धतीने बंदी बनवणं), 354 (सन्मानाचा भंग करण्याच्या हेतूने हल्ला किंवा बळाचा वापर), 354-A (लैंगिक छळ), 376 (2) (महिलेवर अधिकार असणाऱ्या व्यक्तीद्वारे बलात्कार) आणि 376 (2) (K) (नियंत्रण करु शकणाऱ्या व्यक्तीद्वारे बलात्कार) हा खटला चालविण्यात आला होता.
पुण्यात अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार, गोळी झाडून ठार करण्याचाही प्रयत्न
तरुण तेजपाल यांच्याविरोधात नेमके काय आरोप होते?
तरुण तेजपाल यांच्यावर त्यांच्याच सहकारी महिला पत्रकाराने आरोप केला होता की, गोव्यात तेहलका मासिकाचा एका इव्हेंट होता. त्यावेळी एका रात्री जेव्हा ती एका गेस्टला त्याच्या रुमपर्यंत सोडून परत येत होती तेव्हा याच हॉटेलच्या ब्लॉक 7 एका लिफ्टच्या समोर तिला तिचे बॉस तरुण तेजपाल दिसले. यावेळी तेजपाल यांनी गेस्टला पुन्हा जागं करुयात असं म्हणत तिला पुन्हा लिफ्टमध्ये खेचलं असल्याचा आरोप करण्यात आला होता.
गोवा पोलिसांना दिलेल्या एका जबाबत तरुणीने असं म्हटलं होतं की, ‘मला काही कळायच्या आतच तेजपालने लिफ्टची बटणं अशा काही पद्धतीने दाबली की, जेणेकरुन लिफ्ट कुठेही थांबू नये किंवा तिचा दरवाजा देखील उघडू नये. त्यानंतर याच बंद लिफ्टमध्ये त्याने माझा लैंगिक छळ केला.
ADVERTISEMENT