मुंबईतल्या भांडूप स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक लोकल परळ स्थानक आणि त्याआधीच्या स्थानकांवर थांबल्या आहेत. मुंबई ट्रेन अपडेट्स या फेसबुक ग्रुपवरच्या माहितीप्रमाणे कल्याणहून सीएसटीला जाणाऱ्या स्लो ट्रेनचा पेंटाग्राफ हा घाटकोपरजवळ ओव्हरहेड वायरला स्पर्श करत नव्हता. त्यानंतर हा तांत्रिक बिघाड झाला आहे आणि मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
ADVERTISEMENT
गेल्या एक ते दीड तासापासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
गेल्या एक ते दीड तासापासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. स्लो ट्रॅकवर भांडूप स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने ही धीम्या लोकलने घरी जाणाऱ्या प्रवाशांना उशीर सहन करावा लागतो आहे. मुंबई ट्रेन अपडेट्स या ग्रुपवरही यासंबंधीची चर्चा होते आहे.
डोंबिवलीतल्या फास्ट ट्रॅकखाली एक तरूण
बुधवारी डोंबिवलीतल्या फास्ट ट्रॅकखाली एक तरूण आला. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. मध्य रेल्वेची फास्ट ट्रॅकवरची लोकल वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिराने झाली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीच पुन्हा भांडूप स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाला आहे.
११ ऑक्टोबरलाही बिघाड
११ ऑक्टोबरलाही सेंट्रल रेल्वे मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. तांत्रिक कारणांमुळे आणि सिग्नलवरच्या बिघाडामुळे भिवपुरी आणि कर्जत मार्ग या वाहतुकीवर परिणाम झाला होता. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावर सातत्याने काही ना काही बिघाड किंवा इतर काही घटनांमुळे ट्रेन्स उशिराने धावण्याचं प्रमाण वाढलं आहे. याबाबत लोक विविध ग्रुपवर चर्चा करत आहेत.
ADVERTISEMENT