आदित्य ठाकरेंची DNA टेस्ट करा.. ही वादग्रस्त मागणी करणाऱ्या नितेश राणेंनी व्यक्त केली दिलगिरी

मुंबई तक

• 08:35 AM • 07 Jul 2021

आदित्य ठाकरेंची DNA टेस्ट करा, बाळासाहेब ठाकरेंचे नातू आहेत का ते तपासा असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी प्रतिविधानसभेत केलं होतं. त्याबद्दल आज ट्विट करून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रतिरूप विधानसभेत मी जे वक्तव्य आदित्य ठाकरेंबाबत केलं होतं त्याचा चुकीचा अर्थ अनेकांकडून काढला गेला. तसंच त्यामुळे अनेकांच्या भावनाही दुखावल्या गेल्या. मी […]

Mumbaitak
follow google news

आदित्य ठाकरेंची DNA टेस्ट करा, बाळासाहेब ठाकरेंचे नातू आहेत का ते तपासा असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी प्रतिविधानसभेत केलं होतं. त्याबद्दल आज ट्विट करून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रतिरूप विधानसभेत मी जे वक्तव्य आदित्य ठाकरेंबाबत केलं होतं त्याचा चुकीचा अर्थ अनेकांकडून काढला गेला. तसंच त्यामुळे अनेकांच्या भावनाही दुखावल्या गेल्या. मी जे बोललो ते व्यक्तिगत नव्हतं. मी माझे शब्द मागे घेतो असं म्हणत नितेश राणे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

काय घडलं होतं मंगळवारी विधानसभेत?

विधानसभेचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन चांगलंच वादळी ठरलं. यामध्ये तालिका अध्यक्षांशी गैरव्यवहार आणि राजदंड पळवल्याप्रकरणी तसंच गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं. ज्यानंतर लगेचच भाजपने कामकाजावर बहिष्कार घालत सभात्याग केला. इतकंच नाही तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारीही भाजपने कामकाजात कुठलाही सहभाग घेतला नाही आणि विधानसभेच्या पायऱ्यांवर प्रतिरूप विधानसभा विरोधी पक्षाने भरवली. त्यात भाजपचे सगळेच आमदार बोलत होते.

नितेश राणे यांनी काय वक्तव्य केलं होतं?

ते आता पेंग्विनसारखा आवाज असल्यामुळे आता करणार काय? मी बाळासाहेबांचा नातू आहे हे मी पण सांगू शकत नाही अशी अवस्था आहे. (आदित्य ठाकरे यांची नक्कल करुन) म्हणून अध्यक्ष महोदय खरंच डीएन तपासण्याची वेळ आलेली आहे की, हे खरंच आहे की, कुठे कचऱ्यातून उचलेले आहेत. हे खरंच तपासण्याची वेळ आलेली आहे.

ज्या पद्धतीने भ्रष्टाचार सुरु आहे ते निंदनीय आहे, आपल्या नातेवाईकांनाच सगळं काही द्यायचं. पण जेव्हा प्रताप सरनाईकांसारखे अडचणीत येतात तेव्हा त्यांना कलानगरमध्ये बोलावून सांगितलं जातं की, तुमची लढाई तुम्हीच लढा. मग सरनाईकांसारख्यांना सांगावं लागतं की, माझ्या पाठिशी कुणीही उभं नाही.’ अशा पद्धतीने नितेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. आता हे सगळं झाल्यानंतर नितेश राणे यांनी आज एक ट्विट करून दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच आपल्याला कुणालाही दुखवण्याचा उद्देश नव्हता असंही त्यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp