Thane Crime News : गुंड कार घेऊन सोसायटीत घुसले, 8 जणांना उडवलं... ठाण्यात घडलेला प्रकार नेमका काय?

Thane News: गुंडांनी 8 जणांना कारने का धडक दिली, मात्र या घटनेबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

Mumbai Tak

मुंबई तक

19 Feb 2025 (अपडेटेड: 19 Feb 2025, 01:21 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ठाण्यातील मीरा रोड परिसरात गुंडांचा हैदोस

point

सोसायटीमध्ये कार घेऊन धुडगूस

point

गुंडांनी कारने 8 जणांना उडवलं

Thane Crime News:ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतोय. ठाण्यात गुंडगिरीचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. रविवारी सकाळी 6:30 वाजता मीरा रोडवरील विनय नगर येथील जेपी नॉर्थ बार्सिलोना बिल्डिंग सोसायटीमध्ये एका कारने 8 जणांना धडक दिली. या धडकेमुळे 3 सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाले.

हे वाचलं का?

सध्या सुरक्षा रक्षकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं ठाण्यात मोठी खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीसही तिथे पोहोचले आणि कारवाई करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

हे ही वाचा >>Crime : ड्रग्ज तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर महिलांनी फेकलं मिरची पूड टाकलेलं पाणी


कशिश गुप्ता आणि त्याचा साथीदार अक्षित गुप्ता हे या प्रकरणातले आरोपी आहेत. या घटनेनंतर मीरा रोड पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितलं की, एका नंबर नसलेल्या  कारमधून मीरा रोड येथील विनय नगर येथील जेपी नॉर्थ बार्सिलोना बिल्डिंग सोसायटीमध्ये आले होते.

हे ही वाचा >>"आम्ही सगळ्यांचा सुपडा साफ करून दाखवला आणि...", बदलापूरमध्ये CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

दोघांनीही गुंडगिरी करत असताना सोसायटीतील 8 जणांना मारहाण केली. ज्यामध्ये सोसायटीच्या तीन सुरक्षा रक्षकांचाही समावेश होता. तिन्ही सुरक्षा रक्षकांची प्रकृती चिंताजनक आहे. ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच, 8 जणांना कारने का धडक दिली, मात्र या घटनेबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

    follow whatsapp