लस घेतली चोरी नाही केली, उद्धव ठाकरेंची गोष्ट वेगळी:शिवसेना महापौर

सौरभ वक्तानिया

• 10:06 AM • 25 Feb 2021

ठाणे: ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के आणि शिवसेना आमदार रवी फाटक यांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर भाजपकडून जोरदार टीका सुरु आहे. राज्यात आतापर्यंत तब्बल 26 मंत्र्यांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. मात्र, असं असलं तरीही एकाही मंत्र्यांने कोरोनाची लस घेतलेली नाही. अशावेळी लोकप्रतिनिधी यांची फ्रंटलाईन वर्कर्समध्ये तरतूद नसताना देखील ठाण्याच्या महापौरांनी लस का घेतली? असा सवाल […]

Mumbaitak
follow google news

ठाणे: ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के आणि शिवसेना आमदार रवी फाटक यांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर भाजपकडून जोरदार टीका सुरु आहे. राज्यात आतापर्यंत तब्बल 26 मंत्र्यांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. मात्र, असं असलं तरीही एकाही मंत्र्यांने कोरोनाची लस घेतलेली नाही. अशावेळी लोकप्रतिनिधी यांची फ्रंटलाईन वर्कर्समध्ये तरतूद नसताना देखील ठाण्याच्या महापौरांनी लस का घेतली? असा सवाल विचारला जात आहे.

हे वाचलं का?

याचविषयी त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्यासठी ‘मुंबई तक’ने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असं म्हटलं की, ‘लस घेतली म्हणजे काही चोरी केली नाही. आम्ही गल्लोगल्ली फिरतो. म्हणजे फ्रंटलाइन वर्करच आहोत.’ अशी प्रतिक्रिया देत त्यांनी आपली बाजू मांडली. याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस घेतली नसल्याचं याबाबत विचारलं असता त्यांनी नेमकं काय उत्तर दिलं हे जाणून घेण्यासाठी त्यांची ही संपूर्ण मुलाखत नक्की पाहा.

महापौर नरेश म्हस्के यांची मुलाखत

प्रश्न: कोरोनाची लस घेण्यासाठी तुम्हाला टीमएससीने (TMC)शिफारस केली होती का?

नरेश म्हस्के यांचं उत्तर: हो टीएमसीने मला शिफारस केली आणि कोव्हिड अॅपवर त्याची नोंद आहे. आम्ही काय चोर आहोत का?, आम्ही फ्रंटलाइन वर्क नाही आहोत का? कोरोनाच्या काळात गेले 10 महिने कोण काम करतंय… त्यांनी काय म्हटलंय फ्रंटलाइन वर्कर. फ्रंटलाईनमध्ये आम्ही (लोकप्रतिनिधी) येत नाही का?. राजकारणी ही काही जात नाही ना किंवा कॅटेगिरी नाही ना. टीएमसीने कोव्हिड अॅपवर आमचं नाव नोंदवलं आहे. त्यांचा मेसेज आला त्याच्यानंतर आम्ही गेलो. ते देखील लसीकरण सुरु झाल्याच्या एक महिन्यानंतर आम्ही गेलो. मला तर एक महिन्यांपूर्वी मेसेज आला होता.

लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली होती का?

नरेश म्हस्के यांचं उत्तर: हो… अहो लस घेतल्याचं सर्टीफिकेट मला मिळालं आहे. त्याचं काय आहे लसीकरणाला रिस्पॉन्स हा थोडा कमी होता आम्ही आमच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी लस सुरु केली होती. तर आमच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं काय होतं की, एखाद्या जबाबदार व्यक्तीने लस घेतली तर त्याचा फायदा होईल आणि फ्रंटलाईन वर्कर्सला देखील विश्वास निर्माण होईल. ते देखील एक महिन्यानंतर मी ही लस घेतली. एवढंच नाही तर कोव्हिड सेंटरवरील जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा करु शकता. मी लस घेतल्यानंतर किती रिस्पॉन्स वाढला हे तुम्ही पाहू शकता. बरं आम्ही ही लस काय लपूनछपून तर घेतलेली नाही. ही काही चोरी नाही ना. आम्ही याबाबत सोशल मीडियावर देखील फोटो टाकले आहेत. यात काय म्हटलं आहे फ्रंटलाईन वर्कर. आम्ही काय फ्रंटलाईनवर काम करत नाही का? गेले 10-11 महिेने आम्ही रात्रंदिवस काम करत आहोत. अहो आता दररोज 300-400 लोकं पॉझिटिव्ह सापडत आहेत. त्यामुळे मी वॉर्ड ऑफिसला जातोय, हॉस्पिटलला जातोय, लोकांमध्ये फिरतोय.. लोकांना भाजी पुरवण्यापासून ते कामगारांना जेवण देण्यापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून आम्हीच केलं ना, की प्रशासनातले लोक आले यासाठी?

अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस घेतलेली नाही.

नरेश म्हस्के यांचं उत्तर: त्यांचा विषय वेगळा आहे. एवढे मोठे आपण नाही आहोत ना. माझं नगरसेवक या विषयावर म्हणणं आहे. मी सहा महिन्यापूर्वी उद्धव ठाकरेंकडे पत्र देखील दिलं की, लोकप्रतिनिधींना देखील लस देण्यात यावी. आता तुम्ही पाहात आहात की, आमचे किती नगरसेवक मृत्यूमुखी पडले आहेत किती जणांना कोरोना झालाय. या सगळ्या परिस्थितीला आम्ही तोंड दिलं ना. माझं एवढंच म्हणणं आहे की, लोकांसमोर या लॉकडाऊनच्या काळात कोण गेलं? कोण कमी प्रमाणात गेलं कोण जास्त प्रमाणात गेलं. आम्ही काय गेलो नाही का? महापौर असल्याने मला लोकांमध्ये जावं लागतं आम्ही काय माणसं नाहीत का? आम्ही राजकारणी आहोत म्हणजे शापित आहोत का? दरम्यान, माझ्याविरोधात ज्या माणसाने पत्रक काढलंय ना त्याने दोन दिवसापूर्वी लसीकरणासाठी नाव नोंदवलं आहे ही दुटप्पी भूमिका आहे ना.

ही बातमी पण पाहा: ठाणे: महापौर, आमदार यांनी नियम डावलून घेतली कोरोना लस, भाजपचा आरोप

प्रश्न: रवी फाटक यांनी पण लस घेतली आहे…

नरेश म्हस्के यांचं उत्तर: रवी फाटक हे सुद्धा कोव्हिड पॉझिटिव्ह झालेच होते. त्यांच्या पत्नीला देखील कोरोना झाला होता. त्यामुळे तो माणूस नाही का? एवढंच मला म्हणायचं आहे. तो स्वत: सीरियस होता.

तुम्ही लस घेतल्याने नेमका काय फरक पडला?

नरेश म्हस्के यांचं उत्तर: आम्ही लस घेतल्यानंतर लोकांमधील विश्वास वाढला. लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला आता मला एक सांगा, 1 मार्चपासून 45 वर्षावरील ज्यांना लक्षणं आहेत त्यांना तुम्ही लस देणार आहात ना? विषय काय आहे कोव्हिड अॅप हे केंद्र सरकारचं अॅप आहे. त्याच्यावर नाव नोंदवलं गेलं त्यांचा मेसेज आला मग आम्ही लस घेतली ना. हे काय आहे ना… भाजपचं राजकारण आहे. आता काय महापालिकेच्या निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे टीका करायला काही तरी हवं ना.

    follow whatsapp