2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय पातळीवर भाजपला शह देण्याकरता काँग्रेस राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांना पक्षात सहभागी करुन घेणार असल्याचं कळतंय. एकीकडे किशोर यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरु असताना आणखी एका बड्या नेत्याने काँग्रेसला रामराम केला आहे.
ADVERTISEMENT
आसाम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रिपूण बोरा यांनी पक्षाची साथ सोडत तृणमुल काँग्रेसची वाट धरली आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहीलेल्या पत्रात बोरा यांनी, काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांचं भाजपशी छुप संगनमत असल्याचा आरोप केला आहे.
तृणमुल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत बोरा यांनी आपल्या नवीन राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. बोरा यांनी ट्विटरवर काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहीलेलं आपलं पत्र जाहीर केलं आहे.
आपल्या पत्रात बोरा यांनी आपण राजीनाम्याचा निर्णय का घेतला याची कारणमिमांसा केली आहे. “भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी एकत्र येऊन लढण्याऐवजी, आपले नेते हे क्षुल्लक कारणांवरुन आपापसात भांडत आहेत. 2016 मध्ये विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर तुम्ही मला आसाम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलीत. तेव्हापासून पक्षाला पुन्हा उभारी मिळावी यासाठी मी प्रयत्न करतो आहे. परंतू आपल्या नेत्यांच्या आपापसातील भांडणामुळे लोकांचा आपल्यावरील विश्वास उडाला आहे आणि त्यांनी आपल्याला यंदा मतदान केलं नाही.”
राज्यसभा निवडणुकीत काही काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेमुळे दोन्ही जागांवर भाजपचा उमेदवार जिंकला. मला हे तुम्हाला सांगताना अत्यंत दुःख होत आहे परंतू हे तितकचं सत्य आहे की आसाम काँग्रेसमधील काही नेत्यांचं भाजपसोबत छुप संगमनत आहे. त्यामुळे अशा पक्षात काम करणं आपल्याला जमणार नाही असं म्हणत बोरा यांनी राजीनामा देत तृणमुल काँग्रेसची वाट धरली आहे.
प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर?; सोनिया गांधींना सांगितला ‘मिशन २०२४’चा प्लान
ADVERTISEMENT