सोलापूर : शिवसेना (Shivsena) नेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या व्हायरल व्हिडीओवरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. राज्याच्या विधानसभेतही या व्हिडीओ प्रकरणाचे पडसाद उमटले होते. याप्रकरणी आतापर्यंत मोठी कारवाई झाली असून २ डझनहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. अशात नृत्यांगना फेम गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्याही व्हायरल व्हिडीओचा तपास करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) युवा सेना राज्य विस्तारक शरद कोळी (Sharad Koli) यांनी केली आहे. (A few days ago, an offensive video of Gautami Patil went viral on social media. There was a wave of anger in the entire state.)
ADVERTISEMENT
शरद कोळी म्हणाले, गौतमी पाटील यांचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. मग ती तुमची बहीण नाही का? शीतल म्हात्रेंसाठी तुम्ही विधानसभा बंद पाडली. मग या तुमच्या भगिनी नाहीत का? यांना इज्जत नाही का? इज्जत फक्त तुमच्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तीलाच आहे का? शीतल म्हात्रे ही एकच महिला राज्यामध्ये आहे का? अन्य महिलांवरती अत्याचार होतात त्यावरती राज्य सरकार का लक्ष देत नाही. याचा अर्थ तुम्ही पक्षापात करत आहात. कायद्याचा गैरवापर करून सर्वासामान्यांना त्रास देण्याचा काम करत आहात, असं मतही शरद कोळी यांनी व्यक्त केलं.
गौतमी पाटलाच्या वायरल झालेले व्हिडिओची एसआयटी चौकशी करा. बार्शीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. त्याची पोलिसांनी दखल न घेतल्याने आरोपींनी पोलिसांत तक्रार दिली म्हणून मुलीची बोटं छाटली, त्या आरोपींवर कारवाई करा. माजी भाजप जिल्हाध्यक्षांच्या विरोधात फेसबुकवर रोज एक महिला अत्याचार केल्याची तक्रार करत आहे. त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणीही कोळी यांनी यावेळी केली.
Gautami Patil: अजित पवारांचा इशारा, गौतमी पाटीलने जोडले हात, म्हणाली…
गौतमीचा तो व्हिडीओ व्हायरल :
काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला होता. गौतमी पाटीलचं चेंजिंग रुममध्ये चोरुन चित्रीकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या प्रकरणी राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती, तसंच याप्रकरणी राज्य महिला आयोगाने दाखल घेतली होती.
ADVERTISEMENT