संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार असून, 13 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. यामध्ये 19 कामकाजाचे दिवस असणार आहेत. अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे. संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने 19 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती. या अधिवेशनात, सरकार अनेक बिलं सादर करु शकते. या दरम्यान, कोरोना आणि कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात.
ADVERTISEMENT
अधिवेशनात कोव्हिडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संसदेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनी करोना लसीचा किमान एक डोस घेतला असेल, हे तपासलं जाणार आहे.
संसदेच्या अधिवेशन चर्चेत आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार. मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह यांच्याकडे सहकार खातं देण्यात आलं आहे. सहकार हे महाराष्ट्राशी संबंधित खातं आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये सहकार आहे या सहकाराचं खातं वेगळं काढण्यात आलं असून ते खातं अमित शाह यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे ते या खात्याबाबत काही धडाडीचा निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT