Local Offline Pass साठी 11 ऑगस्टला सकाळी 7 पासून उपनगरीय स्थानकांवर सुरू होणार प्रक्रिया

मुंबई तक

• 02:05 PM • 10 Aug 2021

15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले असल्यास मासिक पास मिळू शकणार आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही सेवा उपलब्ध आहे. ११ ऑगस्टपासून म्हणजेच उद्यापासून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ऑफलाईन मासिक रेल्वे पास प्रक्रिया आणि कोव्हिड लसीकरण ऑफलाईन पडताळणी […]

Mumbaitak
follow google news

15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले असल्यास मासिक पास मिळू शकणार आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही सेवा उपलब्ध आहे. ११ ऑगस्टपासून म्हणजेच उद्यापासून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ऑफलाईन मासिक रेल्वे पास प्रक्रिया आणि कोव्हिड लसीकरण ऑफलाईन पडताळणी सुरू केली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबतची माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

काय आहेत या प्रक्रियेच्या अटी?

नागरिकांनी पडताळणीसाठी येताना कोव्हिड लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाल्याचे प्रमाणपत्र आणि छायाचित्र ओळखपत्र पुरावा म्हणून आणणे आवश्यक

पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्यांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा

मुंबई महापालिका क्षेत्रातील ५३ रेल्वे स्थानकांवर 358 मदत कक्ष उभारले जाणार

मुंबई महापालिका क्षेत्रात 109 स्थानकांवर मदत कक्ष

सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत दोन सत्रांमध्ये कार्यरत राहणार मदत कक्ष

घराजवळच्या स्थानकांवर पडताळणीसाठी जावं मात्र विनाकारण गर्दी करू नये

कोव्हिड लसीकरणाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचं आढळल्यास कठोर पोलीस कारवाई केली जाणार

मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना 15 ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8 ऑगस्टच्या रविवारी केली. त्या अनुषंगाने ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ऑफलाईन पडताळणी आणि पास उपलब्ध करण्याची सुरूवात उद्यापासून केली जाते आहे अशी माहिती इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.

आणखी काय म्हणाले चहल?

ज्या नागरिकांनी कोव्हिड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी अशी मागणी सातत्याने होत होती. त्याचीच दखल घेऊन ही संमती देण्यात आली आहे. कोव्हिड प्रतिबंधक लसीचे लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना पडताळणी करून मासिक पास देण्यात येणार आहे. रेल्वे मासिक पास देण्याची ही ऑफलाईन प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत आणि आठवड्यातील सर्व दिवशी सुरू राहणार आहे त्यामुळे लोकांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये असंही आवाहन चहल यांनी केलं आहे.

    follow whatsapp