श्रीलंका: गोटाबाया फरार, सेल्फी, स्विमींग, दारू अन् बेडरूममध्ये WWE…, राष्ट्रपती भवन झाले पर्यटन स्थळ

मुंबई तक

• 11:01 AM • 10 Jul 2022

कोलंबो: आर्थिक संकटाने होरपळलेल्या श्रीलंकेतील नागरिक गेल्या २४ तासांपासून राष्ट्रपती भवनावर ठाण मांडून बसले आहेत. एक दिवस आधी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडून पळ काढला आहे. राजपक्षे यांनी पळ पळ काढल्यानंतर श्रीलंकेतील नागरिक राष्ट्रपती भवनाकडे येतच आहेत. मुख्य गेटवर बंदुकांसह सुरक्षा दल तैनात आहेत. पण, ते कोणालाही रोखू शकत नाहीत. नागरिकांनी राष्ट्रपती भवन हे […]

Mumbaitak
follow google news

कोलंबो: आर्थिक संकटाने होरपळलेल्या श्रीलंकेतील नागरिक गेल्या २४ तासांपासून राष्ट्रपती भवनावर ठाण मांडून बसले आहेत. एक दिवस आधी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडून पळ काढला आहे. राजपक्षे यांनी पळ पळ काढल्यानंतर श्रीलंकेतील नागरिक राष्ट्रपती भवनाकडे येतच आहेत. मुख्य गेटवर बंदुकांसह सुरक्षा दल तैनात आहेत. पण, ते कोणालाही रोखू शकत नाहीत. नागरिकांनी राष्ट्रपती भवन हे पर्यटनस्थळ बनवून टाकले आहे. can’t wait anymore…GOTA GO HOME… असे पोस्टर राष्ट्रपतींच्या घरामध्ये लावण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

राष्ट्रपती भवनात आंदोलकांसाठी पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसेंदिवस आंदोलकांची गर्दी वाढतच आहे. तर पोलीस आणि सुरक्षा दल अजूनही गेटवर पहारा देत आहे. राष्ट्रपतींच्या निवासस्थानाबाहेरही गर्दी जमली आहे. राष्ट्रपती भवनातही लोक कुटुंबासह येऊन राहत आहेत. ठिकठिकाणी सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी गर्दी दिसत आहे.

जमावाने मुख्य गेटही तोडले आहे. येथील परिस्थिती पाहता आता हे ठिकाण पर्यटनस्थळासारखे झाले आहे, असे म्हणता येईल. लोक सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी पोहोचत आहेत. गर्दीने स्वयंपाकघरही काबिज केले आहे. लायब्ररीपासून राष्ट्रपतींच्या पियानोपर्यंत लोक मजा लुटताना दिसत आहेत. लोकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या दिल्या जात आहेत.

राष्ट्रपतींना तात्काळ राजीनामा देण्याची मागणी

या आंदोलनात तरुण आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. गोटाबया यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असे येथील लोकांचे म्हणणे आहे. मात्र, ते 13 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देणार असल्याचे गोटबाया यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र लोक थांबायला तयार नाहीत. ते पद तातडीने सोडण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

इंधनाच्या संकटामुळे रस्त्यावर वाहने नाहीत

कोलंबोमध्ये एक दिवस आधी शनिवारी हिंसक संघर्ष झाला. आज दुसऱ्या दिवशीही राजधानीतील रस्ते सुनेसुने दिसत आहेत. संपूर्ण शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. इंधनाचे संकट इतके गंभीर बनले आहे की वाहनांची वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. इंधनासाठी लोक एका आठवड्यापेक्षा जास्त काळ इथे थांबले आहेत. इंधनाअभावी व्यावसायिक आस्थापनांनाही अडचणी येत आहेत. आतापर्यंत 4 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.

आंदोलकांनी उग्र रुप धारण केले आहे.

आंदोलकांचा जमाव बेडरूम आणि स्वयंपाकघरात घुसला आहे. काही आंदोलक राष्ट्रपती भवनाच्या जलतरण तलावात मस्ती करताना दिसले, तर काही बेडवर गोंधळ घालताना दिसत आहेत. राष्ट्रपती भवनाच्या आतून समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये आंदोलक जोरदार गोंधळ घालताना दिसत आहेत. स्विमिंग पूल, किचन, बेडरूम, लॉन… सगळीकडे आंदोलकांनी कब्जा केला आहे. राष्ट्रपती भवनाच्या आत बांधलेल्या स्विमिंग पूलमध्ये आंदोलक पोहोताना दिसत आहेत.

राष्ट्रपतींच्या जिममध्ये दारू पिण्याचे व्हिडिओ समोर आले असल्याते दिसत आहे. काही व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात आंदोलक स्वयंपाकघरात घुसले आहेत आणि तिथे जेवण करत आहेत. तसेच काही लोक किचनमध्ये अन्न शिजवत असल्याचेही दिसून येत आहे. एका व्हिडिओमध्ये आंदोलक इमारतीच्या आत दारू पितानाही दिसत आहेत.

    follow whatsapp