राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसतायत. अशातच महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेऊन कडन निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये मालिका तसंच सिनेमांच्या शूटींगवर बंदी घालण्यात आली असून काही मालिकांचं शूटींग महाराष्ट्राबाहेर होतंय. यामध्ये पाहिलं न मी तुला मालिकेचं शूट गोव्यात सुरु आहे. तर अभिनेता आशय कुलकर्णीही नुकतंच गोव्यामध्ये दाखल झाला आहे.
ADVERTISEMENT
मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत असलेला अभिनेता ‘आशय कुलकर्णी’ कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मालिकेतून थोडा विराम घेतला होता. मात्र आता शो मस्ट गो ऑन म्हणत आशय नुकताच गोव्यात दाखल झाला आहे. त्यामुळे मालिकेत अनिकेत परत येतोय. यानंतर आता मालिकेत बऱ्याच घडामोडी घडताना दिसणार आहेत.
मालिकेत आता अनिकेत मानसी त्यांचं लग्न झालंय हे घरी सांगणार आहेत. अनिकेतच्या येण्याने मानसी मनातून खंबीर होतेय. मानसीच्या मागे लागलेल्या विक्षिप्त समरला त्याचाच भाषेत उत्तर द्यायला अनिकेत मानसी सज्ज झालेत. त्यामुळे आता समर आणि अनिकेत ची टक्कर होणार हे निश्चित झालंय. त्यामुळे आता पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
ADVERTISEMENT