भारतात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीने मंगळवारी ही बाब स्पष्ट केली आहे की केंद्र सरकारला प्रति डोस 150 रूपये दराने कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा करणं दीर्घकाळ शक्य होणार नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वात महत्त्वाची बाब ठरते आहे ती लसीकरण. लस हे कोरोना होऊ नये म्हणून महत्त्वाचं कवच ठरतं आहे. भारतात सध्या तीन लसी उपलब्ध आहेत. भारत बायोटेकची Covaxin, सिरमची कोव्हिशिल्ड आणि स्पुटनिक व्ही. आता भारत बायोटेकने Covaxin या लसीचे डोस 150 रूपये प्रति डोस या दराने देणं दीर्घकाळ शक्य होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींचं लसीकरण पूर्ण, महाराष्ट्रातलं हे गाव ठरतंय देशासाठी आदर्श
भारत बायोटेकने यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. या निवेदनात खर्च भागवण्यासाठी खासगी बाजारात जास्त किंमत ठेवणं हे आम्हाला आवश्यक आहे. कंपनीने आत्तापर्यंत कोव्हॅक्सिन ही लस विकसित करण्यासाठी क्लिनिकल चाचण्या आणि कोव्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारणं याकरीता 500 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. बारत बायोटेक ही कंपनी सध्या Covaxin ही लस केंद्र सरकारला 150 रूपये प्रति डोस या दराने, राज्य सरकारांना 400 रूपये प्रति डोस तर खासगी रूग्णालयांना 1200 रूपये प्रति डोस या दराने पुरवठा करते आहे. अशात आता कंपनीने ही बाब स्पष्ट केली आहे की भारत सरकारला 150 रूप दराने प्रति डोस लसीचा पुरवठा हा दीर्घकाळ शक्य होणार नाही. आत्ताही खासगी बाजारात त्याची जास्त किंमत मोजावी लागते.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार लस उत्पादनाच्या एकूण उत्पादनापैकी 10 टक्क्यांपेक्षा कमी खासगी रूग्णालयांना दिली जाते. तर उर्वरित लस पुरवठा केंद्र आणि राज्य सरकारांना केला जातो.
Corona Vaccination: ‘राजकीय फायद्यासाठी लसीकरण केंद्राबाहेर बॅनरबाजी नको’, BMC ने कठोर शब्दात सुनावलं!
कोव्हिशिल्डची किंमत 600 रूपये जाहीर केली आहे. त्यात 30 रूपये GST आणि सेवा शुल्क 150 रूपये केल्याने या लसीची किंमत 780 रूपये झाली आहे. कोव्हॅक्सिन लसीची किंमत 1200 रूपये त्यानंतर पाच टक्के जीएसटी 60 रूपये आणि 150 रूपये सेवा शुल्क असं मिळून या लसीची किंमत 1410 रूपये आहे तर स्पुटनिक व्ही या लसीची किंमत 948 रूपये आहे त्यावर 47 रूपये जीएसटी आणि 150 रूपये सेवा शुल्क असं मिळून लसीची एकूण किंमत 1145 रूपये इतकी आहे.
ADVERTISEMENT