Shivraj Patil यांच्या महाभारतातल्या जिहादवरच्या वक्तव्यावरून गदारोळ, आता स्पष्टीकरण देत म्हणाले..

मुंबई तक

• 10:17 AM • 21 Oct 2022

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी भगवद्गीतेची तुलना जिहादशी केली. त्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला. गुरूवारी केलेल्या या वक्तव्यावरून शिवराज पाटील यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांनी वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढत असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण उपस्थितांना काही प्रश्न विचारले होते असंही शिवराज पाटील यांनी म्हटलं आहे. शिवराज पाटील यांनी काय स्पष्टीकरण दिलं? […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी भगवद्गीतेची तुलना जिहादशी केली. त्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला. गुरूवारी केलेल्या या वक्तव्यावरून शिवराज पाटील यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांनी वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढत असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण उपस्थितांना काही प्रश्न विचारले होते असंही शिवराज पाटील यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

शिवराज पाटील यांनी काय स्पष्टीकरण दिलं?

चांगल्या गोष्टींसाठी माणसाच्या संरक्षणासाठी कुणीही शस्त्र उचललं तर त्याला जिहाद म्हणता येणार नाही. महाभारतात दुर्योधनाने जे कृत्य केलं त्याला जिहा म्हणू शकता. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धापासून पळ न काढता त्याला सामोरे जाण्यास सांगितलं. हा जिहाद नव्हता. लढाई, युद्ध सगळ्याच देशांमध्ये धार्मिक ग्रंथात आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

जिहादबाबत बोलताना शिवराज पाटील म्हणाले की तुम्ही कुराण वाचले का? कुराणनुसार देव एक आहे त्याला रंगरूप, आकार नाही. ज्यू आणि ख्रिश्चनांमध्ये देखील असंच म्हटलं जातं. हिंदूंच्या जुन्या ग्रंथातही याबाबत नमूद करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लढाई, युद्ध सगळ्या देशांमध्ये आहे. महाभारत आणि रामायणातही युद्ध आहे. पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं. युद्ध तुम्हाला काही प्रमाणात काही करावं लागतं. वेळप्रसंगी युद्ध करावंच लागतं.

जिहाद आणि युद्ध याची संकल्पना वेगळी

जिहाद आणि युद्ध याची संकल्पना वेगळी आहे शिवराज पाटील यांनी सांगितलं जिहाद म्हणजे स्वार्थासाठी केलेलं युद्ध आणि युद्ध हे संरक्षणासाठी. योग्य कारणांसाठी केलं जातं. श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं की तू लढ, कर्तव्यापासून दूर पळून न जाण्यास सांगितलं याला तुम्ही जिहाद म्हणणार का? असा उलट प्रश्नही त्यांनी केला.

‘श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहादची गोष्ट सांगितली’; शिवराज पाटील चाकूरकर नक्की काय म्हणालेत?

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले, “इस्लाममध्ये जिहादची खूप चर्चा झालीये, असं म्हटलं जातं. आता संसदेत आम्ही जे काही काम करतोय, ते जिहादच्या अनुषंगाने नाहीये. आम्ही विचाराच्या अंगाने काम करतोय.”

“जिहादची गोष्ट कधी कधी येते. जिहादचा मुद्दा तेव्हा येतो, जेव्हा मनात चांगले विचार असतील, त्यासाठी प्रयत्न करूनही जर कुणी समजून घेत नाही. करत नाही. आणि त्यावेळी म्हटलं जातं की तुम्हाला शक्तीचा वापर करायचा असेल, करायला पाहिजे”, असं मत शिवराज पाटील चाकूरकर यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाल्यावर आता हे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

    follow whatsapp