देशभरात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. देशाची राजधानी दिल्लीही त्याला अपवाद नाही. सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्रात वाढत आहेत. मात्र दिल्लीतही कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. दिल्लीत कोरोनाची चौथी लाट आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. मात्र आम्ही या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत असंही अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. दिल्लीकरांनी घाबरून जाऊ नये असंही आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
कोरोना प्रतिबंधासाठी जी काही पावलं उचलण्याची गरज आहे ती आम्ही उचलत आहोत. कोरोना रूग्णांची संख्या दिल्लीत झपाट्याने वाढते आहे मात्र पूर्वीच्या तुलनेत ही प्रकरणं कमी गंभीर आहेत. मृत्यूंचं प्रमाणही कमी आहे तसंच आयसीयूमध्येही रूग्णांना दाखल करावं लागण्याचं प्रमाणही कमी आहे. सरकार कोणत्याही प्रकारचं लॉकडाऊन लादण्याचा विचार करत नाहीये असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
‘या’ एका कारणामुळे पुण्यावर ओढावली ‘मिनी लॉकडाऊन’ची वेळ!
महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर पुण्यात सात दिवसांचा मिनी लॉकडाऊन शनिवारपासून लागू झाला आहे. इतर काही प्रमुख शहारांमध्येही निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणाही कामाला लागली आहे. मात्र रूग्णसंख्या सातत्याने वाढते आहे. दिल्लीतही कोरोना रूग्ण वाढत आहेत मात्र लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
१ एप्रिलपासून केंद्र सरकारने ४५ वर्षे आणि त्यापुढील वयाच्या लोकांना लस देण्याची संमती दिली आहे. त्यामुळे आता दिल्लीत आम्ही कम्युनिटी सेंटर, शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरू करू शकतो असंही अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT